28.9 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeआरोग्यडॉ श्रीकांत शिंदे फौंडेशन तर्फे उल्हासनगर येथे आरोग्य शिबिराचे आयोजन

डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशन तर्फे उल्हासनगर येथे आरोग्य शिबिराचे आयोजन

टीम लय भारी

उल्हासनगर : सध्या कोरोनाचा प्रकोप कमी झाला असून, राज्यातील ग्रामीण भागात विविध ठिकाणी रुग्णांची गैससोय होत होती, त्यांना आर्थिक अडचणीअभावी उपचार घेता येत नव्हते, तर अनेक ठिकाणी अत्यवस्थ रुग्णांना खाटा मिळत नव्हत्या, ऑक्सिजनचा अपुरा तुटवडा भासवत होता. रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नव्हते, अशा विविध स्वरूपाच्या अडचणींना सामोरे जावे लागत होते, अशा रुग्णांना शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ. श्रीकांत शिंदे (Dr.Shrikant Shinde) फाउंडेशन हे मदतीचा हात देत आहे. (Dr.Shrikant Shinde Foundation Health camp organized at Ulhasnagar)

त्याच प्रमाणे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ श्रीकांत शिंदे दे (Dr.Shrikant Shinde) फौंडेशन यांच्या सहकार्याने तसेच शिवसेना शाखा प्रमुख श्री गणेश चौगुले यांच्या विशेष प्रयत्नाने उल्हासनगर येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मा.ना.श्री. ठाणे जिल्हाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्याचा महायद्न्य संपूर्ण राज्यात अखंडपणे सुरु करण्यात आले आहे. या आरोग्य शिबिरात हृदयविकार (ई सी जी) किडणीस्टोन, कॅन्सर, नाक – कान – घसा तपासणी, नेत्र चिकित्सा, मोफत चश्मा वाटप, मोतीबिंदू तपासणी, जनरल ओपीडी या सर्व प्रकारच्या आजारावर मोफत तपासणी व औषध वाटप करण्यात आले.

यावेळी आमदार बालाजी किणीकर, उल्हासनगर शहर प्रमुख राजेंद्र चौधरी, कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, वैद्यकीय सहायक महाराष्ट्र राज्य राम राऊत माऊली धुलगुंडे , स्वरूप काकडे , सागर झाडे , ऋषिकेश देशमुख , नितीन हिलाल , गजानन नारळावर, अरविंद मांडवकर, प्रसाद सूर्यराव, योगेश फनाडे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षेचा संघ उपस्थित होता. विविध शासकीय योजनांची माहिती रुग्णांपर्यंत पोहोचवत त्यांना त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न शिवसेना वैद्यकीय पक्ष (Dr.Shrikant Shinde) त्याच्या माध्यमातून नियमित पणे केला जात आहे.

हे सुद्धा वाचा :- 

Jamuna Bank Foundation organises free medical camp in Cumilla

भारतीय संविधानाची ओळख हा विषय सर्व विद्यापीठात अनिवार्य : उदय सामंत

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी