31 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeराष्ट्रीयद्रौपदी मुर्मू यांचा राष्ट्रपतीपदाचा उद्या होणार शपथविधी

द्रौपदी मुर्मू यांचा राष्ट्रपतीपदाचा उद्या होणार शपथविधी

टीम लय भारी

दिल्ली : नुकत्याच पार पडलेल्या राष्टपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या नेत्या द्रौपदी मुर्मू यांनी विरोधी पक्षातील यशवंत सिन्हा यांना धूळ चारत दणदणीत विजय मिळवला. मुर्मू देशाच्या 15 व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेणार आहेत, हा शपथविधी सोहळा सोमवारी म्हणजेच उद्या पार पडणार असल्याचे सांगण्यात येत आहे. उद्या सकाळी 10 वाजून 15 मिनिटांनी द्रौपदी मुर्मू राष्ट्रपतीपदाची शपथ घेणार असल्याचे सूत्रांकडून कळविण्यात आले आहे.

भाजप नेत्या द्रौपदी मुर्मू या पहिल्या आदिवासी महिला आणि भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती म्हणून राष्ट्रपतीपदी विराजमान होणार आहेत. मुर्मू यांनी राष्ट्रपती निवडणुकीत विरोधी गटातील उमेदवार यशवंत सिन्हा यांचा दारुण पराभव करून विजयावर आपले नाव कोरले. द्रौपदी मुर्मू यांना 2161 मते आणि यशवंत सिन्हा यांना 1058 मते  मिळाली आणि यामध्ये मोठ्या संख्येने कूच करून द्रौपदी मुर्मू यांनी देशाच्या सर्वोच्च स्थानी आपले नाव निश्चित केले.

भाजप नेत्या द्रौपदी मुर्मू यांचा जन्म 20 जून 1958 रोजी ओडिशाच्या मयूरगंज जिल्ह्यातील बैदपोसी गावात झाला. मुर्मू या संथाल आदिवासी वांशिक गटात मोडतात. त्यांचा विवाह श्यामाचरण मुर्मू  झाला होता. दरम्यान त्यांनी त्यांचा नवरा आणि दोन मुले गमावली असून त्यांना इतिश्री मुर्मू नावाची मुलगी आहे.

त्यांचे बालपण अतिशय खडतर गेले असून गरीबीवर मात करीत त्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर, सगळं दुःख गिळून टाकत इथपर्यंतचा प्रवास केला आहे. त्यामुळे सामान्य परिस्थितीतून केलेला असामान्य प्रवासाचा सगळीकडून कौतुक करण्यात येत असून त्यांना राष्ट्रपतीपदासाठी अनेकांकडून अजूनही शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा…

‘तुमचं नेतृत्व भाजपला मान्य नाही हे परत एकदा सिद्ध’, मिटकरींचा मुख्यमंत्री शिंदेंना टोला

शिवसेनेचे हकालपट्टी सत्र सुरूच, पक्षविरोधी कारवाई केल्याने आणखी सात जणांवर कारवाई

क्रिकेटपटू कृणाल पांड्याला झाले पुत्ररत्न, ठेवले ‘हे’ नाव

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी