29 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeमुंबईईडीच्या कारवाया मराठी माणसांवर का ?

ईडीच्या कारवाया मराठी माणसांवर का ?

टीम लय भारी

मुंबई : सगळा पैसा जर गुजराती आणि मारवाडी लोकांकडे आहे. तर ईडीच्या कारवाया मराठी माणसांवर का ? असा प्रश्न शिवसेनेच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून विचारला आहे. त्याला कारण देखील तसेच आहे. आज शिवसेनेचे मोठे नेते संजय राऊत यांच्या घरी ईडीची धाड पडली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून किरीट सोमय्या हे शिवसेनेच्या नेत्यांवर धाडी पडण्याचे इशारे देत होते.

त्याप्रमाणे या धाडींचे सत्र सुरू झाले. शुक्रवारी राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई ही गुजराती आणि मारवाडयामुळे आर्थ‍िक राजधानी आहे असे म्हटले होते. त्यामुळे मनिषा कायंदे यांनी हा प्रश्न विचारला आहे. जे मोठे उदयोजक आहेत. त्यांच्या वर धाडी का पडत नाहीत असा त्यांचा सवाल आहे.आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या घरावर ईडीची धाड पडली. काही दिवसांपूर्वी त्यांच्या पत्नीची ईडीने चौकशी केली होती. संजय राऊत यांची पीएमसी प्रकरणासह पत्राचाळ घोटाळा प्रकरणी चौकशी सुरू आहे.

तर काही महिन्यांपूर्वीच मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव आणि त्यांची पत्नी आमदार यामिनी जाधव हे देखील केंद्रीय ईडीच्या रडारवर आहेत. काही महिन्यापूर्वी आयकर विभागाने त्यांच्या निवासस्थानी धाड टाकली होती. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून शिवसेनेच्या नेत्यांवर भाजपकडून सातत्याने आरोप होत आहे. शिवसेनेचे बडे नेते ईडीच्या रडारवर आहेत. शिवसेनेचे इतर नेते देखील ईडीच्या रडारवर आहेत. त्यातील काही आमदार, खासदार एकनाथ शिंदे यांच्या बंडात सामिल झाले आहेत. यामध्ये प्रताप सरनाईक हे टॉप सिक्युरिटीच्या घोटाळा प्रकरणी ईडीच्या रडारवर आहेत. ईडीने त्यांची व त्यांच्या मुलाचीही चौकशी करण्यात आली होती. त्याच्या मालमत्तेवरही ईडीने टाच आणली होती. ते शिंदे गटात सामिल झाले आहेत.

तर खासदार भावना गवळी यांच्यावर खोट्या सह्या करून ट्रस्टची कंपनी बनवून नॉन प्रॉफिट कंपनी असल्याचं दाखवून पैशांची अफरातफर केल्याचा आरोप आहे. ईडीने भावना गवळी यांच्या ट्रस्टमधील जवळच्या सहकाऱ्याला अटक केली होती. अनिल परब हे ईडीच्या रडारवर आहेत. बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेंनी एनआयए कोर्टाला लिहीलेल्या पत्रात अनिल परबांवर खंडणी वसूल करण्याचे आरोप करण्यात आले आहेत. तसेच दापोली येथील रिसॉर्टच्या बांधकाम प्रकरणी त्यांची चौकशी सुरू आहे. अनिल परब परिवहन मंत्री असताना त्यांच्या शासकीय आणि खासगी निवासस्थानी ईडीने छापा मारला होता.

अर्जुन खोतकर सभापती असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ईडीने चौकशी सुरू आहे. दहा हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांची जमीन अर्जुन खोतकर यांनी हडप केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. ते काल रडत रडत शिंदे गटात गेले.
आनंदराव अडसुळ यांच्यावर सिटी बॅंकेच्या माध्यमातून फसवणूक केल्याचा आरोप आहे.आशा प्रकारे एकना अनेक मराठी माणसांवर नेत्यांवर ईडीची कारवाई सुरू आहे. काही दिवसांपूर्वी भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या मालमत्तेच्या चौकशीची बातमी आली होती.

नंतर लगेच ती बंद देखील झाली. त्यांचे पुढे काय झाले हे कोणालाही कळले नाही. त्यामुळे केवळ ईडी राज्यातील मराठी माणसाला लक्ष करते आहे. ही गोष्ट प्रकर्षांने अधोरेखीत होतांना दिसते आहे. राज्यात अनेक अमराठी उदयोजक आहेत. अनेक परप्रांतीय लोकं खोटी कागदंपत्र तयार करुन घोटाळे करत आहे. ते पैशांनी गब्बर झाले आहेत. त्यांची कोणत्याही प्रकारची साधी चौकशी देखील केली जात नाही.

हे सुध्दा वाचा :

शिवसैनिकांनी केला काळया टोपीवाल्या राज्यपालांचा निषेध

राज्यपालांची बातमी दाबण्यासाठी आज ईडी कारवाईचा मुहुर्त, अरविंद सावंतांचा हल्लाबोल

‘मरेन पण शरण जाणार नाही’, ईडीच्या धाडीनंतर संजय राऊतांचा बाणा कायम

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी