30 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रईडीचा छापा पडताच 'सूडबुद्धीची कारवाई'चा गजर सुरू : ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत...

ईडीचा छापा पडताच ‘सूडबुद्धीची कारवाई’चा गजर सुरू : ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई

टीम लय भारी

मुंबई : परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या शासकीय निवासस्थानी आज पहाटेपासून ईटीने (ED) छापेमारी सुरू केली आहे. यासोबत त्यांच्या वांद्र्यातील घरातही कारवाईला सुरुवात झाली असून महाराष्ट्रात एकूण सात ठिकाणी ही कारवाई सुरू झाल्याचे दिसत आहे.(ED On Shivsena Legislature Anil Parab)

अनिल परबांच्या (Anil Parab) निवास्थानी प्रमाणे राज्यातील त्यांच्याशी संबंधित एकूण सातठिकाणी कारवाई (ED) करण्यात आली आहे. परब यांच्यावर झालेल्या कारवाईवर संपूर्ण राजकीय र्वतुळातून टिका केली जात आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ‘अनिल देशमुख, नवाब मलिक तुरुंगात आहेत, आता अनिल परबनी तयार राहावे’ या प्रकारचे वक्तव्य केले आहे. तर खासदार संजय राऊतांनी ‘सूडाच्या भावनेने कितीही कारवाया केल्या तरी आम्ही गप्प बसणार नाही.’ या भाषेत प्रत्युत्तर दिले.

या संपूर्ण राजकीय कुरापतीत ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनी त्यांचे मत मांडले आहे. ते म्हणाले की…अनिल परबांवर ईडीचा (ED) छापा पडताच ‘सूडबुद्धीची कारवाई’चा गजर सुरू झाला! त्यासंबंधी काही माहिती आणि पुराव्यांची बाब एका वार्ताहराने काढताच संजय राऊत म्हणाले की, ‘या तांत्रिक तपशिलात मला जायचे नाही…’ अरे, कारवाई कोणत्या गोष्टींच्या आधारे झाली आहे, हे तर समजून घ्यावे लागेल ना! जर कारवाई अन्यायकारक असेल, तर भक्कम माहिती देऊन हे आरोप फेटाळून लावा की!समर्थ युक्तिवाद करा.

नुसतेच ‘सूडबुद्धी, सूडबुद्धी’ असे ओरडणेदेखील योग्य नाही… शिवाय अनिल परब हे काही अण्णा हजारे नाहीत, त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या शब्दात ‘पब्लिक आउटक्राय’ वगैरे काही होणार नाही नि झालेला नाही… इतक्या कारवायांनंतर देखील आपल्याबद्दल जनतेत सहानुभूती का निर्माण होत नाही, याचा महाविकासच्य (ED) नेत्यांनी गंभीरपणे विचार केला पाहिजे. असा संदेश राजकीय नेत्याना हेमंत देसाई यांनी दिली.

हे सुद्धा वाचा :- 

“Go Home And Cook”: Maharashtra BJP Leader’s Sexist Jab At MP Supriya Sule

सुप्रिया सुळे यांनी माझ्या वक्तव्याचा ‘पराचा कावळा’ केला : चंद्रकांत पाटील

विधवा पुनर्विवाह जकातवाडी पॅटर्न राज्य शासनाने महाराष्ट्रात राबवावा व पुनर्विवाह करणाऱ्या विधवेला अनुदान द्यावे जकातवाडी ग्रामपंचायतीची मागणी

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी