मुंबईराजकीय

अनिल परबांच्या घरी ईडीची छापेमारी,आता भाजप नेत्यांना टिकेसाठी खुले मैदान

परिवहन मंत्री अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानी आज पहाटेपासून ईटीने छापेमारी सुरू केली आहे. यासोबत त्यांच्या वांद्र्यातील घरातही कारवाईला सुरुवात झाली असून महाराष्ट्रात एकूण सात ठिकाणी ही कारवाई सुरू झाल्याचे दिसत आहे.

टीम लय भारी

मुंबई : परिवहन मंत्री अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानी आज पहाटेपासून ईटीन (ED raids) छापेमारी सुरू केली आहे. यासोबत त्यांच्या वांद्र्यातील घरातही कारवाईला सुरुवात झाली असून महाराष्ट्रात एकूण सात ठिकाणी ही कारवाई सुरू झाल्याचे दिसत आहे.भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit somaiya) यांनी अनिल परब (Anil parab) यांच्या विरोधात विविध तक्रारी नोंदविल्या होत्या. सचिन वाझे यांच्या १०० कोटींच्या प्रकरणातही अनिल परब यांचं नाव समोर आलं होत.(ED raids Anil Parbhan’s house)

अनिल परबांच्या घरी ईडीची छापेमारी,आता भाजप नेत्यांना टिकेसाठी खुले मैदान

परबांचे साथीदार संजय कदम यांच्या घरातूनही मोठं घबाड हाती लागलं होतं. मनी लॉंडरिंग प्रकरणातील ईडीच्या या कारवाईनंतर परब यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. त्यासंदर्भात गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली आहे. तसेच अनिल परब (Anil parab) यांच्यावर सुमारे 50 कंत्राटदारांकडून (ED raids) कोट्यवधी रुपयांची वसुली केल्याचाही आरोप आहे. या प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचा संशय अधिकारांना आहे. त्यातून या कारवाईला सुरुवात झाली आहे.

अनिल देशमुख, नवाब मलिक तुरुंगात आहेत, आता अनिल परबनी तयार राहावे : किरीट सोमय्या

या कारवाई पार्श्वभूमीवर भाष्य करताना सोमय्या (Kirit somaiya) म्हणाले, “बेनामी मालमत्ता, आर्थिक अफरातफर ,बोगस कंपन्या, केंद्रीय पर्यावरण मंत्रालयालयाकडे करण्यात आलेल्या तक्रारी (ED raids) आणि फेमा कायद्यातील तरतुदींच्या उल्लंघनासाठी ईडीने कारवाई सुरू केली आहे. मंत्री अनिल देशमुख, नवाब मलिक हे तुरूंगात गेले. आता परब यांची वेळ आली आहे”.

संजय राऊत संतप्त भावनेते म्हणाले…

याबाबत शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, ज्याप्रकारे अनिल परब यांच्यावर कारवाई (ED raids) होतेय त्याहून गंभीर गुन्हे भाजपा नेत्यांवर आहेत. मात्र त्यांच्यावर कारवाई होत नाही. सूडाच्या भावनेने कितीही कारवाया केल्या तरी आम्ही गप्प बसणार नाही. सरकार सुरळीत चालेल. नवलानीला कुणी (Anil parab) पळवले त्याचे उत्तर द्यावे असं त्यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा :- 

Maharashtra Minister’s Home Searched In Money Laundering Probe

रुपाली चाकणकरांची मुलासाठी भावनिक पोस्ट!

मराठी मालिकांमधील प्रसिध्द अभिनेत्रीचे थेट बॉलिवूडच्या विश्वात पदार्पण

Tags

आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close