29 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeक्राईममुंबईच्या 'या' माजी पोलिस आयुक्तांच्या मागे लागली ईडीची पीडा

मुंबईच्या ‘या’ माजी पोलिस आयुक्तांच्या मागे लागली ईडीची पीडा

लय भारी टीम

मुंबई – अवघ्या तीन दिवसांपूर्वीच मुंबई पोलिस आयुक्त पदावरून निवृत्त झालेले संजय पांडे यांच्या मागे सुद्धा आता ईडीची पीडा सुरू झाली आहे. ईडीने पांडे यांनी नोटीस बजावली असून पाच जुलै रोजी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

यापुर्वी माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांना ईडी कारवाईस सामोर जावे लागले आहे. त्यानंतर काहीच दिवसांत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या बेकायदेशीर,बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी ईडीने देशमुख यांच्या मालमत्तेवर धाड टाकून कारवाई केली आहे.दरम्यान तीनच दिवसांपूर्वी निवृत्त झालेले माजी पोलिस आयुक्त संजय पांडे आता ईडीच्या गळाला लागले आहेत.

संजय पांडे यांना NSE सर्वर कंप्रमाइज केस प्रकरण आणि चित्र रामकृष्णा ऑडिट कंपनी या संदर्भात ही नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यामुळे परमबीर सिंह, अनिल देशमुख यांच्याप्रमाणे ईडीची पीडा पांडे यांना सुद्धा संकटात टाकणार का हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा :

वांद्रे शासकीय वसाहतीतील रहिवाशांनी ‘या’ कारणासाठी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट

आरे वाचवण्यासाठी ठाकरे बंधूंचे एकमत

लब्यू उद्धवजी, मराठी अभिनेत्याचे उद्धव ठाकरे यांना पत्र

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी