27 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
HomeसंपादकीयDurga Puja : पश्चिम बंगालमध्ये दुर्गा पूजेला सुरुवात

Durga Puja : पश्चिम बंगालमध्ये दुर्गा पूजेला सुरुवात

पश्चिम बंगालमध्ये आता दुर्गोत्सवाला (Durga Puja) सुरूवात झाली आहे. यावर्षी 1 ऑक्टोबर ते 5 ऑक्टोबरपर्यंत दुर्गोत्सव सुरू राहणार आहे. नवरात्रीच्या सहाव्या, सातव्या, आठव्या, नवव्या आणि दहाव्या दिवशी दुर्गा पूजा केली जाते. सहाव्या माळेला कल्पारंभ करून देवीला आव्हान करतात.

पश्चिम बंगालमध्ये आता दुर्गोत्सवाला (Durga Puja) सुरूवात झाली आहे. यावर्षी 1 ऑक्टोबर ते 5 ऑक्टोबरपर्यंत दुर्गोत्सव सुरू राहणार आहे. नवरात्रीच्या सहाव्या, सातव्या, आठव्या, नवव्या आणि दहाव्या दिवशी दुर्गा पूजा केली जाते. सहाव्या माळेला कल्पारंभ करून देवीला आव्हान करतात. तर दसऱ्याच्या दिवशी विसर्जन केले जाते. या दिवसांमध्ये देवी लक्ष्मी, सरस्वती, गणपती आणि कार्तिकेय यांची पूजा केली जाते. बंगलामध्ये या पूजेला ‘अकाल बोधन’ असे म्हणतात. या देवीची 108 न‍िल कमलांनी पूजा केली जाते. ही पूजा रात्रीच्यावेळी केली जाते. यावेळी मंत्रोच्चार करून देवीला जागवले जाते. कलश स्थापन केला जातो, बेलाच्या झाडाची पूजा केली जाते. देवीला आमंत्रण दिले जाते.

नवरात्रीच्या सहाव्या दिवशी पहाटे घटस्थापना केली जाते. तर दुसऱ्या दिवशी नवपत्रीने देवीची पूजा केली जाते. यामध्ये विविध प्रकारच्या नऊ पानांचे गुच्छ देवीला अर्पण केले जातात. याला ‘नवपत्र‍िका’ पूजन असे म्हणतात. यामध्ये केळे, हळद, दारू हळद, जयंती बेल, डाळींब, अशोक, भात, अंबा या पानांचा समावेश असतो. सुर्योदयापूवीच गंगेसारख्या पवित्र नदीमध्ये स्नान करून ही पानं देवीला अर्पण केली जातात. तसेच सफेद गोकर्णची फांदी देवीला अर्पण केली जाते. मुलींसाठी सप्तमी खास असते. या दिवशी मुली पिवळी साडी नेसून देवीच्या मंद‍िरात जातात. त‍िसऱ्या आणि चौथ्या दिवशी धुनूची नृत्य करतात. हे नृत्य सप्तमीला सुरू केले जाते.

हे सुद्धा वाचा

Repo Rate बापरे ! एका वर्षात चार वेळा वाढले रेपो रेट

Adhani : आदानींच्या कंपनीला मिळाले मोठे काम

America : अमेरिकेतल्या ‘या’ भागात झाली बत्तीगुल

हे शक्ती नृत्य आहे. बंगालमध्ये देवीची शक्ती, ऊर्जा वाढवण्यासाठी हे नृत्य केले जाते. नारळाच्या तुसांपासून धूर केला जातो. हवन सामग्री जाळून धूर केला जातो. या धूराने देवीची आरती केली जाते. पाचव्या दिवशी शिंदूर उधळून देवीच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते. शेवटच्या दिवशी महिला शेंदूर खेळतात. या दिवशी एकमेकांना शेंदूर लावतात. या दिवशी मीठाई वाटली जाते. त्यानंतर देवीचे विसर्जन केले जाते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी