महात्मा गांधींजींशी संबंधित प्रसंग १ – हरिद्वारला कुंभमेळा भरला होता. महात्मा गांधी कुंभमेळ्याला ट्रेनने निघाले होते. ट्रेन सहारनपूरला थांबली. एक मुस्लीम युवक पाणी घेऊन आला, पण बोगीतल्या अनेकांनी तहान असूनही त्याच्या हातचे पाणी घेतले नाही. गांधींनी आश्चर्याने चौकशी केली, तेव्हा समजले की हिंदू-मुस्लीम द्वेषभावनेमुळे दोन्ही बाजूचे लोक असे वागतात. गांधींना लक्षात आले हा प्रश्न फार जटिल आहे (Mahatma Gandhi and Muslim Hindu Relation). प्रसंग २ – दिल्लीच्या लालकिल्ल्यात सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेचे सैनिक बंदी बनवून ठेवण्यात आले होते. गांधी भेटण्यास गेले, तेव्हा चहाची वेळ होती. मुस्लीम चहा आला होता, मुस्लीम कैद्यांना तो दिला गेला. हिंदू चहा अद्याप यायचा होता.
गांधींनी विचारले हा काय चहा आहे? तेव्हा त्यांना समजले की, सैनिकांमध्ये भेद नाही, पण तसा
सरकारी आदेश आहे. हिंदू आणि मुस्लिमांना धार्मिक आधारावर वेगळा चहा द्यायचा, असे त्या आदेशात म्हटले होते.
गांधी नेहमीच देशातल्या धार्मिक तणावासाठी इंग्रजांना दोषी धरत. तेव्हाचे व्हाईसराय व्हावल यांना एका भेटीत त्यांनी
तसे स्पष्ट सुनावले होते. तुम्ही आगीत तेल घालण्याचा प्रयत्न करू नका. या विषयापासून दूर राहा. पण इंग्रज त्यांचे काम
करीत राहिले.
हे सुद्धा वाचा
गांधींनी नुकसान नव्हे, देशावर मोठे उपकार केले
ब्राह्मण खरंच गांधींविरोधी आहेत का ?
महात्मा गांधी मुस्लिमांचं खरंच तुष्टीकरण करीत होते का ?
स्वातंत्र्य मिळविण्याच्या सुभाषबाबूंच्या हिंसक आंदोलनाबाबत गांधीजींचे तीव्र मतभेद होते, तरीही अनेक बाबतींत ते
सुभाषबाबूंचे कौतुक करीत. त्यातील सर्वाधिक पसंत असलेली गोष्ट म्हणजे त्यांनी आपल्या सेनेमध्ये हिंदू आणि मुस्लीम
यांच्यामध्ये न केलेला भेदभाव! समान भावनेने दोन्ही समाजांतले सैनिक एकत्रित उभे राहात, ही एकतेची भावना
निर्माण करणाऱ्या बाबूंना माझा कडक सलाम! या शब्दांत गांधीजी बोलले होते, म्हणजे हा प्रश्न सुटावा, दोन समाजात
आपापसात मतभेद अथवा द्वेषाची भावना राहू नये, ही गांधीजींची मनापासूनची इच्छा होती, हा निष्कर्ष या घटनामधून
निघतो.
गांधी धार्मिक होते याबद्दल कुणाला केव्हाच शंका नव्हती, मरतानाही 'हे राम' म्हणून प्राण सोडणारा महात्मा… तरीही
धार्मिक कट्टरतेचा आग्रह त्यांनी का धरला नाही, याची अनेक कारणे आहेत. गांधींचे विचार ज्याने त्यांना महात्मा
बनवले, ते विचार स्वाभाविक कसल्याही द्वेषाला जागा देणारे नसले तरीही त्यात आलेली नैसर्गिक स्वाभाविकता ही
संस्कार आणि सहवासातून आली होती. लहानपणी शेख मेहताब नावाचे त्यांचे सवंगडी होते. त्यांच्या घरीच गांधींनी
मांसाहारी अनेक डिशेसचा आनंद घेतला होता, दक्षिण आफ्रिकेत त्यांच्या आयुष्यातील पहिली नोकरी देणारा त्यांचा बॉस
हा एक मुस्लीम होता. दादा अब्दुला त्यांचे नाव. भारतात आल्यावर दांडी मार्चच्या दरम्यान तुरुंगात जाण्याची वेळ
आली, त्यावेळी अत्यंत दिग्गज अनुयायी असतानाही त्यांनी अब्बास तय्यबजी यांच्या हाती नेतृत्वाची काठी सोपवली,
असा निर्णय त्यांनी का घेतला असावा? मुस्लीम तुष्टीकरण म्हणून का? तर अजिबात नाही, एका अर्थाने कट्टर हिंदू
असलेल्या गांधींना हे दक्षिण आफ्रिकेत असतानाच कळून चुकले होते की, हिंदू विरुद्ध मुस्लीम हा संघर्ष किती खोलवर
रुजलेला आहे.
भारतात आल्यावर अशिक्षित, पारतंत्र्याची जाणीव नसलेला तसेच अनेक समूहात विभागलेल्या, अनेक जाणिवांत
अडकलेल्या तसेच अंधश्रद्धांमध्ये जखडलेल्या जनतेला जागृत करण्याचे कार्य त्यांनी सुरू केले, या ओघानेच हिंदू-मुस्लीम
जनतेला एकत्र आणण्याचेही प्रयत्न त्यांनी सुरू केले. ही सर्वसमावेशकता त्यावेळी देशाची गरज होती, इंग्रज जसे राज्य
करताना जाती धर्मातील भेदाचा खुबीने वापर करीत तसाच देशाच्या स्वातंत्र्यलढ्याची मूळ गरज ही एकता होती, हे
गांधीजींनी ओळखले होते. म्हणूनच अगदी खिलाफत चळवळीचेही त्यांनी समर्थन केले.
दलित चळवळीला ताकद देण्यासह इतर प्रयत्नही त्यांनी व्यापक स्तरावर केले, त्यामध्ये केवळ मुस्लीम नाही तर अन्य
धर्मीयांना जोडण्याचे काम त्यांनी यशस्वीपणे केले. टू नेशन थेअरी त्यांनी कधीच मान्य केली नाही, कारण धर्म हा देश
चालवण्याचा विचार असू शकत नाही, या मतावर ते ठाम होते. धर्म आणि देश यामध्ये समन्वय ठेवून राष्ट्राची वाटचाल
होऊ शकते, असा त्यांचा समज काळाच्या ओघात चूक ठरला, तुलनेत पंडित जवाहरलाल नेहरू यांचे धर्म ही वैयक्तिक
बाब आहे आणि देश भावना हा सार्वजनिक विषय असे मत होते.
(क्रमश:)