29 C
Mumbai
Thursday, April 18, 2024
HomeसंपादकीयPM : पाकिस्तानात जन्मलेले भारताचे पंतप्रधान

PM : पाकिस्तानात जन्मलेले भारताचे पंतप्रधान

विनम्र स्वभाव, प्रचंड अभ्यासू, अर्थतज्ञ असलेले भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा आज वाढदिवस आहे. डॉ. मनमोह‍न सिंग हे भारताचे 14 पंतप्रधान (PM) होते. ते एक विचारवंत तसेच अर्थतज्ञ आहेत.

विनम्र स्वभाव, प्रचंड अभ्यासू, अर्थतज्ञ असलेले भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा आज वाढदिवस आहे. डॉ. मनमोह‍न सिंग हे भारताचे 14 पंतप्रधान (PM) होते. ते एक विचारवंत तसेच अर्थतज्ञ आहेत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचा जन्म 16 सप्टेंबर 1932 रोजी अखंड भारताच्या पंजाब प्रांतामध्ये झाला. ते खेडेगावात जन्माला आले. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचा जन्म पंजाबमधील गोह नावाच्या गावात झाला. आज तो भाग पाकिस्तानमध्ये आहे. त्यांनी 1948 मध्ये पंजाब विद्यापीठातून पदवी घेतली. त्यानंतर पुढील शिक्षण त्यांनी केंम्ब्रिज विद्यापीठात घेतले. 1957 मध्ये त्यांनी केंम्ब्रिज विद्यापीठात अर्थशास्त्राची पदवी घेतली. 1962 मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्राची पदवी घेतली. त्यांनी अर्थशास्त्रावर काही पुस्तके लिह‍िली आहेत.

त्यापैकी इंडियाज एक्सपोर्ट ट्रेंडस ॲण्ड प्रॉसस्पेक्टस फॉर सेल्फ सटेन्ड ग्रोथ हे पुस्तक भारताच्या व्यापाराची समीक्षा करणारे आहे. ते पंजाब विद्यापीठामध्ये प्राध्यापकाचे काम करत होते. मनमोहन सिंग 1987-1990 या काळात जीनिव्हा येथे साऊथ किमिशनचे सरचिटणीस होते. तर 1971मध्ये वाण‍िज्य मंत्रालयात सल्लागार म्हणून काम केले. मनमोहन सिंह यांनी अर्थमंत्रालयात अनेक पदे भूषवली. सचिव, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, रिझर्व बँकेचे गव्हर्नर, पंतप्रधानांचे प्रमुख सल्लागार, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्षपद त्यांनी पंतप्रधान होण्याच्या आधी भूषवले. 1991 ते 1996 या काळात ते भारताचे अर्थ मंत्री होते.

हे सुद्धा वाचा

Sonia Gandhi : सोन‍िया गांधींची डोकेदुखी वाढली

Shinde government : शिंदे सरकारने काढला गरीबांच्या तोंडातला घास

Narayan Rane Bungalow Demolition: नारायण राणेंच्या बंगल्यावर पुन्हा ‘बुलडोजर!’ सुप्रीम कोर्टाने दिले आदेश

भारताच्या आर्थिक सुधारणांमध्ये त्यांची महत्त्वाची भूमीका आहे.त्यांना 1987 मध्ये पद्मविभूषण ,1995 मध्ये जन्म शताब्दी सन्मान, 1993-1994 मध्ये अशिया मनी ॲवार्ड पुरस्कार त्यांना मिळाले. 1957 मध्ये केंम्ब्रीज विद्यापीठाचा राईट पुरस्कार असे अनेक नावाजलेले पुरस्कार त्यांना मिळाले. डाँ. मनमोहन सिंग यांनी अनेक अंतरराष्ट्रीय परिषदा आणि संघटनांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्त्व केले. 1993 मध्ये त्यांनी व्ह‍िएन्ना येथे मानवाधिकार बैठकीमध्ये भारताचे प्रतिनिधीत्त्व केले. 1991 पासून ते राज्यसभेवर निवडून गेले. 1998-2004 राज्यसभेत विरोधी पक्ष नेते पद भूषवली. 22 मे 2004 मध्ये ते देशाचे पंतप्रधान झाले. त्यानंतर पुन्हा 22 मे 2009 मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये ते दुसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान झाले.

भारताच्या इतिहासात ते उदारनितीचे असल्याची ओळख त्यांनी निर्माण केली.त्यांच्या घरची परिस्थ‍िती फार हालाखीची होती. त्यांच्या आई-वडीलांचे निधन लहानपणीच झाले त्यानंतर त्यांच्या आजीने त्यांचा सांभाळ केला. अम्रतसरमधील आटेवाली गल्लीमध्ये आली.भारताच्या अर्थशास्त्रामध्ये त्यांच्या नितीला अनन्य साधारण महत्त्व आहे. कारण कर्जात बुडालेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला त्यांनी नवसंजीवनी दिली. जागत‍िक व्यापारासाठी बंद केलेले दरवाजे त्यांनी उघडले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी