29 C
Mumbai
Saturday, September 16, 2023
घरसंपादकीयDahi Handi 2022 : मुंबईतील गोविंदाच्या मृत्यूनंतर सरकारने दहिहंडीबाबत घेतलेल्या निर्णयांवर प्रश्न

Dahi Handi 2022 : मुंबईतील गोविंदाच्या मृत्यूनंतर सरकारने दहिहंडीबाबत घेतलेल्या निर्णयांवर प्रश्न

संदेश दळवी या तरुणाच्या मृत्यूनंतर सरकारने दहीहंडीचा खेळात समावेश करण्याचा जो निर्णय घेतला, तो खरंच योग्य आहे का ? महत्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. न्यायालयाने दहीहंडीच्या उंचीबाबत काही नियम आखून दिले आहेत. पण या नियमांचे कोणाकडूनही पालन करण्यात आले नाही.

तब्बल दोन वर्षानंतर राज्यात दहीहंडी (Dahi Handi) सण उत्साहात आणि सर्व नियम धाब्यावर बसवून साजरा करण्यात आला. कोरोनानंतर दहीहंडी उत्सव साजरा होत असल्याने सर्व गोविंदा (Govinda) पथकांमध्ये उंचचउंच थर रचण्याची स्पर्धाच लागली होती. त्यामुळे अनेक पथकांनी यावर्षी सात पेक्षा अधिक थर रचण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे यावर्षी सर्वाधिक गोविंदा हे जखमी झाले आहेत. पण काल (ता. 22 ऑगस्ट) मुंबईतील एका दहीहंडी पथकातील एका जखमी गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुःखद घटना समोर आली आहे. संदेश दळवी (वय वर्षे 22) असे या तरुण गोविंदाचे नाव आहे. संदेश दळवी याच्या मृत्यूनंतर आता सरकारने दहीहंडीबाबत घेतलेल्या निर्णयांवर मात्र प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.

मुंबईतील विले पार्ले येथील शिवशंभो या दहीहंडी पथकात संदेश दळवी होता. सातव्या थरावरून खाली कोसळून संदेश गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर त्याला तातडीने नानावटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सर्वात वरच्या म्हणजे सातव्या थरावरून खाली कोसळल्याने संदेशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. रविवारी त्याच्या डोक्यावर शस्त्रक्रिया सुद्धा करण्यात आली. परंतु संदेशाची मृत्यूशी झुंज अयशस्वी ठरली आणि त्याने जगाचा निरोप घेतला. संदेश मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांना तात्काळ 10 लाख रुपयांची मदत देणार असल्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून आश्वासन देण्यात आले आहे.

दरम्यान आता संदेश दळवी याच्या मृत्यूनंतर सरकारने दहिहंडीबाबत घेतलेल्या निर्णयांवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. राज्य सरकारने स्वतःची पोळी भाजण्यासाठी गोविंदांना खुश करत कोर्टाने दहीहंडीसाठी घालून दिलेल्या सर्व नियमांची पायमल्ली केली. ज्यामुळे राजकारण्यांकडून गोविंदांना उंच मनोरे रचण्याचे आवाहन करण्यात आले आणि आकर्षक बक्षीस ठेवण्यात आली. यामुळे अनेक गोविंदा पथकांनी उंच मनोरे रचले ज्यामुळे अनेक गोविंदा जखमी झाले. दहिहंडीमध्ये राजकीय हस्तक्षेप वाढल्याने दहिहंडीवरसुद्धा राजकारण्यांचा आणि राजकीय पक्षांचा प्रभाव दिसून आला.

परंतु आता संदेश दळवी या तरुणाच्या मृत्यूनंतर सरकारने दहीहंडीचा खेळात समावेश करण्याचा जो निर्णय घेतला, तो खरंच योग्य आहे का ? महत्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. न्यायालयाने दहीहंडीच्या उंचीबाबत काही नियम आखून दिले आहेत. पण या नियमांचे कोणाकडूनही पालन करण्यात आले नाही. ज्यामुळे दहीहंडीच्या उंचीबाबत लढाई लढणाऱ्या स्वाती पाटील यांनी दहीहंडीचे उल्लंघन करणाऱ्या दहीहंडी पथक आणि नियमांना पायदळी तुडवणाऱ्या आयोजकांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. स्वाती पाटील यांनी दादर, वरळी, चेंबूर आणि ठाणे येथील नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल्या आहेत. तसेच यंदा नऊ थर रचलेल्या जोगेश्वरीतील जय जवान गोविंदा पथक आणि कोकण नगर गोविंदा पथक यांच्याविरोधात सुद्धा तक्रार दाखल करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

Dahi Handi 2022 : ‘दहीहंडी’चा खेळात समावेश, मुख्यमंत्र्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

Dahihandi Insurance 2022 : गोविंदांना मुंबई भाजपकडून 10 लाखांचे विमा कवच जाहीर

Dahi Handi 2022 : शासकीय रुग्णालयामध्ये जखमी गोविंदांवर होणार मोफत उपचार

कोर्टाकडून गोविंदा पथकांना 20 फुटांची उंची निर्धारित करून देण्यात आली होती. तसेच गोविंदा पथकातील सर्वात वरच्या थरावरील गोविंदा हा 14 वर्षांखालील नसावा हा महत्वाचा नियम आखून दिला होता. याचबरोबर गोविंदाच्या सुरक्षेबाबत उपाययोजना, दहीहंडीचा कार्यक्रम रस्त्यावर आयोजित न करता मोकळ्या मैदानात आयोजित करणे, दहीहंडी पथक जिथे थर रचतील त्याठिकाणी माती किंवा मॅट टाकणे, गोविंदा पथक लावत असलेल्या थरांची व्हिडीओ रेकॉर्डिंग करणे हे नियम कोर्टाकडून आखून देण्यात आले होते. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘निर्बंधमुक्त’ दहीहंडी साजरी करण्याची घोषणा करताच राजकीय पक्षांनी याचा बाजार मांडत गोविंदांना लाखोंची बक्षिसे देण्याची प्रलोभने दिली आणि ज्यामुळे न्यायालयीन नियम मात्र धाब्यावर बसवले गेले.

परिणामी आता संदेश दळवी या तरुण गोविंदाच्या मृत्यूनंतर सरकारने घेतलेले निर्णय हे खरंच योग्य होते का ? आणि सरकार आपल्या निर्णयावर ठाम राहणार का ? संदेश दळवीच्या कुटुंबियांना आर्थिक मदत तात्काळ देण्यात येणार का ? तसेच जखमी गोविंदांचे उपचार मोफतच होत आहेत का ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे .

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी