33 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeसंपादकीयसचिन तेंडूलकरला बाळासाहेब ठाकरेंनी दिल्या होत्या कानपिचक्या

सचिन तेंडूलकरला बाळासाहेब ठाकरेंनी दिल्या होत्या कानपिचक्या

धनश्री धुरी : टीम लय भारी

क्रिकेटचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा त्याच्या खेळामुळे अनेकांचा आदर्श बनला आहे. त्याने आजवर क्रिकेट क्षेत्रात अनेक शतक ठोकत आपल्या चाहत्यांची मने जिंकली होती. परंतु एके काळी सचिनने मुंबईवर केलेल्या वक्तव्यामुळे त्याने मराठी माणसांची मने दुखावली होती. मुख्य म्हणजे त्याच्या या वक्तव्यावर खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनी सचिनला समज दिली होती (Sachin Tendulkar was advised by Balasaheb Thackeray).

सन 2009 साली मुंबई मध्ये रेल्वे भरतीसाठी परिक्षा घेण्यात आल्या होत्या. या परीक्षेत सहभाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मुंबईच्या विद्यार्थ्यांपेक्षा उत्तर बिहारच्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त होती. परप्रांतीयांचे वाढते वर्चस्व राज ठाकरे यांना रुचले नाही. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी उत्तर बिहार मधून परीक्षेसाठी मुंबईत आलेल्या विद्यार्थांना मारहाण केली होती. यामुळे राज ठाकरे यांना अटक सुध्दा करण्यात आली होती.

बाळासाहेबांनी युंडूगुंडू विरोधी मोहीम हाती घेतली आणि शिवसेनेची स्थापना झाली

कट्टर शिवसैनिक बाळासाहेब ठाकरेंची खोटी शपथ घेऊच शकत नाही : संजय राऊत

(Sachin Tendulkar was advised by Balasaheb Thackeray
बाळासाहेब ठाकरे आणि सचिन तेंडूलकर

हा वाद चर्चेत असताना नवी दिल्लीत सचिन पत्रकार परिषदेत बोलत होता. त्यावेळी एका पत्रकाराने सचिनला या वादावरून प्रश्न विचारला होता की, मुंबई फक्त मराठी माणसांचीच आहे का? यावर उत्तर देताना सचिन म्हणाला, ‘ मी पहिला भारतीय आहे मग महाराष्ट्रीय आहे. तसेच मुंबई ही सर्व भारतीयांची आहे. सचिनचे हेच वक्तव्य बाळासाहेब ठाकरे यांना रुचले नाही.

Sachin Tendulkar was advised by Balasaheb Thackeray
मुंबई ही सर्व भारतीयांची आहे असे सचिन म्हणाला होता

आनंद दिघेंनी शिवसेना वाढवली आणि एकनाथ शिंदेंनी त्यांचा वारसा पुढे चालवला

BJP leaders seek FIR against Uddhav Thackeray for remarks against Yogi Adityanath, file complaint

बाळासाहेबांनी सचिनला समज देण्यासाठी सामनामधून एक पत्र लिहिले होते. हे पत्र सामनाच्या मुखपृष्ठावर छापून आले होते. या पत्राची हेडिंग होती, ‘ सचिन तू तुझी आंतरराष्ट्रीय खेळपट्टी सांभाळ ‘.

पुढे पत्रात लिहिण्यात आले की, ‘ सचिन एक लक्षात ठेव तुझ्या बॅटने तू चौकार व षटकार मारतोस त्यावेळी लोक तुझी वाहवा करतात. पण मराठी माणसाच्या न्यायहक्कावर जर तू तुझ्या जिभेची बॅट करून मराठी माणसाच्या जिव्हारी लागणारे चौकार किंवा षटकार मारशील तर मात्र मराठी माणूस ते कधीच सहन करणार नाही. ‘ तसेच क्रिकेटच्या खेळपट्टीवर तू जे कमवलं आहेस ते राजकारणाच्या खेळपट्टीवर गमावू नकोस. असा सल्ला देखील बाळासाहेबांनी पत्रातून सचिनला दिला होता.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी