32 C
Mumbai
Friday, April 19, 2024
HomeसंपादकीयSmita Patil : स्पॉट बॉयच्या घरासाठी पर्समधून पैसे काढून देणारी 'स्मिता पाटील'

Smita Patil : स्पॉट बॉयच्या घरासाठी पर्समधून पैसे काढून देणारी ‘स्मिता पाटील’

‘स्मिता पाटील’ सत्तरच्या दशकातील एक सशक्त अभिनेत्री, स्वतंत्र विचारांची स्त्री आणि संवेदनशील मनाची व्यक्ती मंत्र्याची मुलगी ते प्रसिद्ध अभिनेती असा तिचा प्रवास.

‘स्मिता पाटील’ सत्तरच्या दशकातील एक सशक्त अभिनेत्री, स्वतंत्र विचारांची स्त्री आणि संवेदनशील मनाची व्यक्ती… मंत्र्याची मुलगी ते प्रसिद्ध अभिनेत्री असा तिचा प्रवास…. मात्र या पुढे जाऊन तिच्यातील माणूसकीमुळे तीने सर्वांची मने जिंकली. अवघ्या 31 व्या वर्षी तिने जगाचा निरोप घेतला, आज तिचा वाढदिवस, त्यानिमित्त तिच्यातील संवेदनशील माणसाच्या काही आठवणींना उजाळा…

स्मिता तिच्या सहकाऱ्यांची नेहमी काळजी घेत असे, एकदा तिच्या चित्रपटाचे चित्रिकरण सुरू होते. यावेळी तिथे एका स्पॉट बॉयला पैशांची गरज असल्याचे लक्षात येताच तिने त्याक्षणी पर्समधून पैसे काढून त्या स्पॉट बॉयला दिले. एका अभिनेत्रीने आपली अडचण जाणून घेतली, आपल्याला क्षणाचाही विलंब न करता आर्थिक मदत केल्याचे पाहून तो स्पॉट बॉय अतिशय भावनिक झाला. खरे तर त्याच्या घराचे पत्रे उडाले होते. त्याला घर दुरूस्त करायचे होते. आज काम केले नाही तर पैसे मिळणार नाहीत म्हणून तो कामावर आला होता. ही गोष्ट स्मिताला कळाल्यानंतर तिने त्याक्षणी पर्समधून पैसे काढून त्या स्पॉट बॉयच्या हातात ठेवले.

कामगारांसोबत बसून चहा घेणारी स्मिता
स्मिता तशी उच्चभ्रू कुटुंबात वाढलेली, वडील मंत्री, ती स्वत: प्रसिद्ध अभिनेत्री पण याचा लवलेश देखील तिला कधी शिवला नाही. साधी सरळ राहणाऱ्या स्मिताच्या नव्या घराचे काम सुरू होते. घराचे काम सुरू असताना कामगारांची लगबग सुरू असे, त्यावेळी स्मिता कामगारांना स्वत: किटलीतून चहा देत असे, इतकेच नाही तर त्यांच्यासोबत तिथेच बसून त्यांची विचारपूस करत चहा देखील घेत असे.

शोषित स्त्रियांसाठी झटणारी स्मिता
स्त्रियांच्या संस्थेकरता काम करताना जेव्हा ती त्या शोषित स्त्रियांच्या करून कहाणी ऐकायची तेव्हा ती अत्यंत व्यथित व्हायची. आणि काही वैयक्तिक केसेस मध्ये स्वतः आर्थिक मदत द्यायची. सामाजिक बांधिलकीच्या जानिवेतून सामाजिक कामांमध्ये देखील तिने आपली वेगळी ओळख निर्मान केलीच एक व्यक्ती म्हणून स्मिता जीवाला जीव देणारे असे तिचे व्यक्तीमत्व होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी