30 C
Mumbai
Wednesday, April 17, 2024
Homeसंपादकीयचहाचा इतिहास ! चहा पिल्यामुळे टिळकांवर पडला होता बहिष्कार, गंगेत डुबकी मारून...

चहाचा इतिहास ! चहा पिल्यामुळे टिळकांवर पडला होता बहिष्कार, गंगेत डुबकी मारून आले होते…

प्राची ओले : टीम लय भारी 

चहा !! नाव घेतलं तरी अंगात तरतरी येते. जेवढा चहा बनवायला सोपा तेवढा त्या मागचा इतिहास गुंतागुंतीचा आहे. चहाचा शोध कोणी लावला ह्या विषयावर अनेक गोष्टी आहेत. काही खऱ्या वाटतील, काही दंतकथा आहेत. परंतु चहाचा उगम हा चीनमध्ये झालाय ह्यावर साऱ्या इतिहासकारांचे एकमत आहे. चहा ह्या वनस्पतीचा वापर पहिला आयुर्वेदा मध्ये केला जायचा.

 

चीनमध्ये अशी कथा आहे की, अनेक शतकांपूर्वी चीनमध्ये सत्तेत असलेल्या शेंनोंग नावाच्या राजाला प्यायला गरम पाणी लागत असे. एकदा त्याचा मुक्काम जंगलात असतना त्याच्या सैनिकाने त्याला तिथेच चूल मांडून पाणी गरम करायला ठेवले. ते पाणी गरम होत असताना त्या पाण्यात सुकलेल्या चहाची पाने पडली, आणि त्या चहाचा रंग बदलला. राजाला ते पाणी खूप आवडले. त्या राजाने ती झाडे शोधून त्याची लागवड केली. त्यामुळे चहाची लोकप्रियता चीनमध्ये वाढली. ती लोकप्रियता एवढी वाढली की छपाई यंत्राचा शोध लागल्यवर काहीच दिवसांनी चहावर आधारित पुस्तक ‘ली यु’ या लेखकाने ‘द क्लासिक ऑफ टी’ हे लिहिले (Tea originated in China).

महिला समानता दिन 26 ऑगस्ट रोजी का साजरा केला जातो, जाणून घ्या कारण

सुभेदार मल्हारराव होळकरांचे ऐकले असते तर पानिपत जिंकले असते

या चहाची लोकप्रियता इतकी वाढली की, हळू हळू सगळ्या देशांमध्ये चहा पोहोचला. चहाला लोकप्रियता मिळाल्यामुळे चीनने चहावर कर आकारण्यास सुरुवात केली. सुरुवातीला चीन चहाच्या ऐवजी ब्रिटिशांकडून चांदी घेत. ब्रीटीशांकडील चांदी हळू हळू कमी होऊ लागल्याने ब्रिटीश चांदी ऐवजी चीनला अफू देऊ लागले. अफुमुळे चीनमध्ये लोक व्यसनाधीन होऊ लागले आणि अफूचा चोरटा व्यापार होऊ लागला. याचे पर्यवसान चीन आणि इंग्लंड यांच्यातील संबंध बिघडवण्यावर आणि पुढे दोन युद्धे झाली. ह्याच युद्धांला अफूचे युद्ध असे म्हणतात. ह्या अफूच्या युद्धाला चहाच जबाबदार होता, असे मानण्यात काही वावगे नाही (Tea was responsible for the opium war).

अमेरिकेचे हवामान चहाला पूरक असल्याने हळू हळू तिथेही पुढे चहाचा विस्तार होऊ लागला. इंग्रजांप्रमाणेच त्याची वसाहत असणाऱ्या अमेरिकेमध्येही  चहा लोकप्रिय झाला. चहावर लावलेल्या अतिरिक्त करामुळे आणि इंग्रज इस्ट इंडिया कंपनीला कुठलाही कर ना भरता अमेरिकन वसाहतींमध्ये चहा विकण्याची परवानगी दिल्यामुळे, वसाहतींमधील राष्ट्रप्रेमी नाराज झाले. या धोरणांचा निषेध करण्यासाठी त्यांनी बोस्टन बंदरात घुसून तीन जहाजांवरचा जाव्ल्प्स तीनशे टन चहा समुद्रात फेकून दिला. ह्याच घटनेला बोस्टन पार्टी म्हणून ओळखले जाते. ही घटना अमेरिकन स्वातंत्र्य लढ्यासाठी प्रेरणादायी ठरली. अमेरिकेत चहा पिणे हे देशविरोधी मानले जाते. म्हणून अमेरिकेमध्ये कॉफीला जास्त महत्व दिले जाते (Tea became popular).

History of tea Tilak was boycotted for drinking tea
बोस्टन पार्टीतले क्षणचित्र

ब्रिटीश जेव्हा भारतात आले तेव्हा, त्यांना असे दिसले की चहासाठी चीनपेक्षा आसाम हे जास्त थंड वातावरणाचे ठिकाण आहे. चहाला हे वातावरण पूरक ठरेल, म्हणून त्यांनी आसाममध्ये चहाची लागवड सुरु केली. चीनमध्ये चहा हा पाण्यात उकळवून पिला जायचा. परंतु, ब्रीटीशांनी चहामध्ये दुध आणि साखर मिसळून चहा बनवला. पुढे ह्याचा मसाला चहा वगैरे प्रकार उदयास आले (Tea was boiled in water and served in China).

History of tea Tilak was boycotted for drinking tea
हळू हळू चहा बनवण्याच्या पद्धतीमध्ये बदल होऊ लागले, त्यात मसाला चहा हा प्रकार समविष्ट झाला.

स्वदेशी चळवळी दरम्यान गांधीजींनी देखील चहावर बंदी टाकली होती. हे तर काहीच नाही, चहा पिल्यामुळे लोकमान्य टिळकांवर त्यांच्या समाजाकडून बहिष्कार टाकण्यात आला होता. आनंदी बाई जोशींचे पती गोपाल जोशी ए अत्यंत विक्षिप्त स्वभावाचे गृहस्त होते. पुण्यातील नेते जनतेसमोर वेगळे आणि ब्रीटीशांसमोर  वागतात असे त्यांचे म्हणणे होते. त्या लोकांचे पितळ लोकांसमोर उघडे पाडण्यासाठी त्यांनी एक युक्ती केली होती. पुण्यात गुरुवार पेठेत पंचहौद मिशन हा महाराष्ट्रातल्या सर्वात जुन्या चर्चपैकी एक चर्च आहे. तिथल्या शाळेत एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला पुण्यातील बडी मंडळी उपस्थित होती. कार्यक्रम संपल्यानंतर साऱ्यांना चहा आणि बिस्कीट देण्यात आले. त्यावेळेस त्या सगळ्यांच्या समोर पंचाईत उभी राहिली. एका ख्रिश्चनाच्या हातचा चहा पिणे त्या मंडळीना पाप वाटत होते. काहींनी तो चहा घेतला, काहींनी घेतल्यासारखे केले, तर काहींनी स्पष्ट नकार दिला (Gandhiji had also banned tea during the Swadeshi movement).

‘लज्जा’ कादंबरीमुळे बांगला देशातून तस्लिमा नसरीन यांना का केले हद्दपार, जाणून घ्या

Best quotes on tea : Tea without sugar means life without love

History of tea Tilak was boycotted for drinking tea
चहा पिल्यामुळे लोकमान्य टिळकांवर त्यांच्या समाजाकडून बहिष्कार टाकण्यात आला होता

हे सगळे करण्यामागे गोपाळराव जोशी यांचा दुहेरी हेतू होता. जर टिळक, रानडे आणि इतर नेत्यांनी चहा नाकारला असता तर, त्यांच्यवर सुशिक्षित असून जुन्या विचारांचे असल्याचे आरोप लागले असते. जर त्यांनी तो चहा पिला असता तर त्यांच्यावर अधर्मकृत्य केल्याचे आरोप सनातन्यांनकडून लागले असते. लोकमान्य टिळकांनी ‘कोणत्याही धर्मात चहा पिऊ नये’ म्हणून असे लिहिलेले नाही, त्यामुळे माझे काही चुकलेले नाही अशी भूमिका घेतली. टिळकांवर पुण्याच्या ब्राह्मणांनी बहिष्कार टाकला. लोकमान्य टिळक हे कायद्याचे अभ्यासक होते. त्यांनी केसरी वृत्तपत्रातून देखील स्वताची भूमिका मांडली. टिळकांनी काशीला जाऊन गंगेत डुबकी मारली आणि त्याचे सर्टिफिकेट आणून दाखविले. लोकमान्य टिळकांनी घेतलेल्या ह्या सुधारित भूमिकेमुळे पुण्यात चहा बद्दलची भीती कमी झाली. आता जर आपण पुण्यात फिरले तर प्रत्येक गल्लीत अमृततुल्य ची दुकाने दिसतील. चहाच्या दुकानांमुळे करोडपती झालेले लोक पुण्यात आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी