33 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रशिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण

टीम लय भारी

मुंबई : राज्याच्या शिक्षणमंत्री आणि काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण झाली आहे. अधिवेशनामध्ये मंत्री, आमदार आणि इतर लोकांच्या संपर्कात आल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनाची लागण झाल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी स्वतः दिली आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे असल्यामुळे त्या विलगीकरणात आहेत. राज्यात आणि मुंबईत ओमिक्रॉनचा संसर्ग वाढत आहे. तसेच कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे राज्य सरकारकडून रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. काही दिवसांपुर्वी एका आमदारालाही कोरोनाची लागण झाली आहे(Education Minister Varsha Gaikwad infected by  corona).

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण झाली आहे. वर्षा गायकवाड यांनी ट्वीट करत कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती दिली आहे. ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, कोरोनाची लक्षणे आढळल्यामुळे कोरोना चाचणी केली होती. कोरोना चाचणीचा अहवाल सकारात्मक आला आहे. सौम्य लक्षणे असल्यामुळे घरीच विलगीकरण केले आहे. तसेच जे मागील काही दिवसांपासून संपर्कात होते त्यांनी काळजी घ्यावी असे आवाहनसुद्धा वर्षा गायकवाड यांनी केले आहे.

महिलांनी लष्करात यावे यासाठी प्रयत्न केले : शरद पवार

मुंबई महापालिका Omicron ला रोखण्यासाठी सज्ज; महापौरांनी मुंबईकरांना केलं आवाहन,म्हणाल्या…

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड स्वतः सोमवारी विधानपरिषदेत आणि विधानसभेत उपस्थित होत्या. विधानपरिषदेत वर्षा गायकवाड यांनी शिक्षण विभागाबाबतच्या प्रश्नांवर उत्तरे दिली आहे. शिक्षण विभागाशी संबंधित असलेल्या प्रश्नांवर त्यांनी माहितीसुद्धा दिली आहे. सभापती आणि अध्यक्षांच्या संपर्कात वर्षा गायकवाड आल्या होत्या यामुळे अधिक चिंता वाढली आहे. या आधी विधानभवनातील पोलीस अधिकारी, आमदार आणि कर्मचारीसुद्धा कोरोनाबाधित आढळले आहेत.

31 डिसेंबरपर्यंत राज्यात नवी नियमावली लागू

Maharashtra Minister Tests Positive, Attended Assembly Session Yesterday

यापूर्वीही झाली होती कोरोनाची लागण

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना २०२०मध्ये कोरोनाची लागण झाली होती. सप्टेंबर २०२० मध्ये वर्षा गायकवाड यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल कऱण्यात आले होते. कोरोनाची लक्षणे आढळल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कोरोना अहवालही सकारात्मक आला होता.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी