30 C
Mumbai
Wednesday, April 17, 2024
Homeएज्युकेशनआयआयटी मुंबईतील शुल्कवाढी विरोधात अ‍ॅड. अमोल मातेले यांचा घेराव घालण्याचा इशारा

आयआयटी मुंबईतील शुल्कवाढी विरोधात अ‍ॅड. अमोल मातेले यांचा घेराव घालण्याचा इशारा

आयआयटी मुंबईमध्ये विविध शीर्षकाखाली बेकायदेशीरपणे शुल्कवाढ करण्यात आली आहे. याप्रकरणी सर्वांनीच तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आयआयटी मुंबईने शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये हि शुल्कवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

आयआयटी मुंबईमध्ये विविध शीर्षकाखाली बेकायदेशीरपणे शुल्कवाढ करण्यात आली आहे. याप्रकरणी सर्वांनीच तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आयआयटी मुंबईने शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये हि शुल्कवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांकडून अन्यायकारकपणे अधिकचे शुल्क कोणतीही पूर्वसूचना न देता आकारण्यात येणार असल्याची माहीती समोर आली आहे. यामुळे आता या बेकायदेशीर शुल्कवाढी विरोधात आयआयटी मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे ऍड. अमोल मातेले (Adv. Amol Matele) यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून घेराव घालण्याचा इशारा दिला आहे. आयआयटी, मुंबईच्या शुल्कवाढीविरोधात ऍड. अमोल मातेले यांनी संताप व्यक्त केला. त्यामुळे ऍड. अमोल मातेले यांनी आयआयटी, मुंबईला शुल्कवाढ कमी करण्यासंदर्भातील निर्णय मागे घ्यावा, अशी विनंती केली आहे.

मुंबई आयआयटीकडून विविध शीर्षकाखाली आकारण्यात येणाऱ्या शुल्कात ४५ % वाढ तर जिमखाना शुल्कात ३४% वाढ करण्यात आली आहे. तसेच शैक्षणिक वर्ष २०१७-१८ मध्ये वसतिगृहाचे भाडे ५०० रुपयांवरून थेट दोन हजार रुपयेपर्यंत वाढ करण्यात आली होती, तरीही वसतिगृहातील सोयी-सुविधांसाठी अतिरिक्त १८०० रुपये शुल्क वाढ या निर्णयावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते अ‍ॅड. अमोल मातेले यांनी आयआयटी, मुंबईचे संचालक, श्री. सुभाष चौधरी यांना ई-मेलव्दारे पत्र पाठवून खेद व्यक्त करीत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पाठींबा देणार असल्याचे जाहीर केले आहे.

आयआयटी सारख्या संस्थेने शुल्कवाढीबाबत विद्यार्थ्यांना आणि पालकांना कोणतीही पूर्व सूचना किंवा ई-मेल व्दारे माहिती न दिल्याने अ‍ॅड. अमोल मातेले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, कोरोनाच्या प्रादुर्भावामुले अद्यापही लोकांची आर्थिक परिस्थिती रुळावर आलेली नसल्याने त्यांच्या परिस्थितीचा विचार करून सामंजस्यपणे तातडीने बैठक बोलावण्यात यावी आणि बेकायदेशीर अन्यायकारक शुल्कवाढ मागे घेण्यात यावी अशी विनंती केली आहे, अन्यथा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे ‘घेराव’ घालण्याचा इशारा अ‍ॅड. अमोल मातेले यांनी दिला आहे.

हे सुद्धा वाचा :

ईडीने देशातील नऊ राज्यांना धरले वेठिस

वाचा : संजय राऊत यांच्या अटकेचा घटनाक्रम

संजय राऊत यांच्यानंतर ईडीचा रोख उद्धव ठाकरेंकडे? निलेश राणे यांचे मोठे विधान

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी