29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeएज्युकेशनमहाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या भव्य वास्तूचे सोमवारी राज्यपालांच्या हस्ते भूमिपूजन

महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या भव्य वास्तूचे सोमवारी राज्यपालांच्या हस्ते भूमिपूजन

महाराष्ट्र हे उद्योगप्रधान राज्य म्हणून देशभरात ओळखले जाते. राज्यात उद्योगधंदे वाढत असताना कुशल मणूष्यबळाची देखील आवश्यकता असते हे ओळखूनच महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाची  स्थापना करण्यात आली आहे. या विद्यापीठाची भव्य इमारत पनवेल येथे उभारली जाणार आहे. या इमारतीचे भूमिपूजन राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांच्या हस्ते सोमवार (दि. २७) रोजी होणार असल्याची माहिती विद्यापीठाच्या कुलगुरु अपुर्वा पालकर यांनी दिली.

पनवेल येथे सोमवारी विद्यापीठाच्या भव्य वास्तूचे भूमिपूजन होत असून या सोहळ्याला राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती कुलगूरु अपूर्वा पालकर यांनी दिली.
हे सुद्धा वाचा
कौशल्य विद्यापीठाच्या पहिल्या कुलगुरूपदी डाॅ. अपुर्वा पालकर यांची नियुक्ती 

Jobs Updates : कौशल्य विद्यापीठात महत्वाच्या अधिकारपदांची भरती

जस्टिन बीबरची पत्नी हेली बीबरला धमक्या, सेलेना गोमेझचा खुलासा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात महाराष्ट्र राज्य कोशल्य विद्यापीठाला मान्यता देण्यात आली होती. शिंदे-फडणवीस सरकाने देखील या विद्यापीठासाठी अर्थसंकल्पात मोठी तरतुद केली आहे. राज्यातील युवापिढीला कौशल्य आधारित शिक्षण मिळावे, त्यांना रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध व्हाव्यात. येणाऱ्या काळात नवी आव्हाने स्विकारण्यासाठी सक्षम तरुणपिढी निर्मान व्हावी यासाठी तरुणांना कौशल्य आधारित शिक्षणाची गरज आहे. त्या दृष्ढीने राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी