36 C
Mumbai
Tuesday, April 16, 2024
Homeएज्युकेशनCaste Certificate : शाळा, विद्यालयांमध्ये मिळणार जात वैधता प्रमाणपत्र

Caste Certificate : शाळा, विद्यालयांमध्ये मिळणार जात वैधता प्रमाणपत्र

विद्यार्थ्यांना आता त्यांच्या शाळेत किंवा महाविद्यालयात कास्ट सर्टिफिकेट मिळणार असून त्याची आजपासून राज्यभर अंमलबजावणी सुरू झाल्याचे डॉक्टर प्रशांत नारनवरे यांनी सांगितले. उस्मानाबाद येथे बोलत असताना नारनवरे यांनी ही सदर माहिती दिली.

शालेय, महाविद्यालयीन स्तरावर कास्ट सर्टिफिकेट खूप महत्त्वाचे असते. या सर्टिफिकेटमुळेच अनेकांना अगदी सहजपणे अॅडमिशन प्रक्रियेतून पास होत इच्छित शाळेत, महाविद्यालयात प्रवेश घेता येतो. कोणाची आर्थिक स्थिती खुपच बेताची असेल तर अशा वेळी ही एक सर्टिफिकेट खूप महत्त्वाची ठरते, परंतु दरवेळी ही कास्ट सर्टिफिकेट मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते, त्याला खूप वेळ जातो हे वेगळंच त्यामुळे यावर पर्याय म्हणून राज्य शासनाकडून एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्यात येणार असून यामध्ये आता थेट शाळेतच विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट (Cast Certificate) उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे समाज कल्याण आयुक्त डॉक्टर प्रशांत नारनवरे (Prashant Narnavare) यांनी दिली.

विद्यार्थ्यांना आता त्यांच्या शाळेत किंवा महाविद्यालयात कास्ट सर्टिफिकेट मिळणार असून त्याची आजपासून राज्यभर अंमलबजावणी सुरू झाल्याचे डॉक्टर प्रशांत नारनवरे यांनी सांगितले. उस्मानाबाद येथे बोलत असताना नारनवरे यांनी ही सदर माहिती दिली. यावेळी बोलताना डाॅ. प्रशांत नारनवरे म्हणाले, विद्यार्थ्यांचे बरेचसे दाखले शाळेत असतात, त्यामुळे जातपडताळणी समिती शाळेत जाऊन विद्यार्थ्यांचे अर्ज स्विकारेल आणि संबंधित कागदपत्रांची पुर्तता केल्यास अवघ्या सात दिवसांत जातपडताळणी प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना प्राप्त होणार आहे.

हे सुद्धा वाचा…

Queen Elizabeth : पाणावलेल्या नेत्रांनी महाराणी एलिझाबेथ यांना भावपूर्ण निरोप

Smriti Mandhan : वनडे सामन्यात भारताचा इंग्लंडवर रोमहर्षक विजय, स्मृति मंधानाचे शतक थोडक्यात हुकले

Niti Ayog and Maharashtra: ‘महाराष्ट्रामध्ये नीती आयोगच्या धर्तीवर स्वतंत्र संस्था स्थापन करणार’

या संपुर्ण योजनेविषयी बोलताना डाॅ. प्रशांत नारनवरे पुढे म्हणाले, राज्यात सेवापंधरवडा साजरा करीत आहोत. ही योजना 17 तारखेपासून सुरू झालेली आहे. यामध्ये आम्ही विविध कार्यक्रम घेत आहोत. जसं राज्याच्या सर्व शाळांमधून कास्ट सर्टिफिकेट देणे त्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांना पाचारण करून त्यांच्या मदतीने आम्ही काम करत आहोत,असे डाॅ. नारनवरे म्हणाले.

राज्याच्या सर्व महाविद्यालयातून विशेषतः सायन्यचे महाविद्यालय तिथे जात वैधता प्रमाणपत्र देणं अपेक्षित असतं, तर ज्या कास्ट सर्टिफिकेटच्या एजन्सी आहेत ते त्या त्या शाळेत जाऊन जात वैधता प्रमाणपत्र देणार आहेत. त्यासोबतच ट्रान्सजेंन्डर सर्टिफिकेट, उसतोड कामगारांसाठी सर्टिफिकेट या सगळ्याच बाबतीतील काम लोकांच्या दारी जाऊन करणार आहोत. एक मोठी सेवा देण्याचा कार्यक्रम यातून आखण्यात आलेला आहे असे म्हणून नारनवरे यांनी या योजनेची इत्तंभूत माहिती दिली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी