28.9 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeएज्युकेशनCBSE Board Exam 2023 : सीबीएसई बोर्ड परीक्षेची तारीख जाहीर, वाचा सविस्तर...

CBSE Board Exam 2023 : सीबीएसई बोर्ड परीक्षेची तारीख जाहीर, वाचा सविस्तर…

सदर परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून या परीक्षेचे संपुर्ण वेळापत्रक डिसेंबर महिन्यात जाहीर करण्यात येणार आहे. सत्र 2022-23 च्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा अभ्यासक्रमाबाबत सुद्धा सांगण्यात आले असून परीक्षा कोरोनापूर्वीच्या (Coronavirus) अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे.

सीबीएससी म्हणजेच सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एज्युकेशनची इयत्ता दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली असून सदर परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून या परीक्षेचे संपुर्ण वेळापत्रक डिसेंबर महिन्यात जाहीर करण्यात येणार आहे. सत्र 2022-23 च्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा अभ्यासक्रमाबाबत सुद्धा सांगण्यात आले असून परीक्षा कोरोनापूर्वीच्या (Coronavirus) अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे. कोरोना संकटामुळे सगळंच विस्कळीत झालं त्यामुळे हे लक्षात घेता CBSE ने गेल्या वर्षीच्या अभ्यासक्रमात तब्बल 30 टक्के कपात करीत विद्यार्थ्यांना दिलासा दिला होता, अशी माहिती सीबीएसईचे परीक्षा (CBSE Exams) नियंत्रक संयम भारद्वाज यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना दिली.

इंडियन एक्सप्रेसशी बोलताना संयम भारद्वाज म्हणाले, सीबीएसई बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक डिसेंबर 2022 मध्ये प्रसिद्ध होईल. हे वेळापत्रक cbse.nic.in वर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. सत्र 2022-23 साठी परीक्षेचा अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष 2019-20 प्रमाणेच असेल. यामध्ये कोणतीही कपात केली जाणार नाही. सीबीएसई बोर्डाच्या परीक्षांबाबत अफवा पसरल्यानंतर याबाबतची संपुर्ण स्पष्टता भारद्वाज यांनी यावेळी दिली.

हे सुद्धा वाचा…

Mumbai News : चेंबूर हत्याकांड प्रकरणाची सत्ताधाऱ्यांकडून दखल

Chandrakant Khaire : ‘ठाकरे परिवाराच्या विरोधात बोलाल, तर याद राखा’

Pune Bridge : पुणेकरांची कोंडी करणारा पूल क्षणार्धात उद्धवस्त, वाचा नेमकं काय घडलं…

मागच्या वर्षी सीबीएसईकडून परीक्षा कोरोना संकटामुळे दोन टर्ममध्ये घेण्यात आल्या होत्या, मात्र यावर्षी तसेच काही होणार नसून एकाच वेळी ही परीक्षा पार पडणार आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांचा सुद्धा गोंधळ उडणार नाही यांची पुरेपुर काळजी यावेळी घेण्यात आली आहे. गेल्या वर्षी पहिल्या टर्मच्या परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये पार पडली होती तर दुसऱ्या टर्मची परीक्षा 26 एप्रिलला सुरू झाली होती.

सदर परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून त्याबाबतचे संपुर्ण वेळापत्रक डिसेंबरमध्ये जाहीर करण्यात येणार आहे. यंदाच्या वर्षी परीक्षा एकाच टर्ममध्ये होणार असल्याने विद्यार्थ्यांना सुद्धा थोडा दिलासा मिळणार आहे. यंदा कोरोना संकट बऱ्यापैकी ओसरल्यामुळे नेहमीप्रमाणे या परीक्षांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या परीक्षेबाबत पसरणाऱ्या वेगवेगळ्या अफवांवर अजिबात कोणीच विश्वास ठेऊ नये असे वारंवार सांगण्यात येत आहे. परीक्षेचे वेळापत्रक सीबीएससीच्या मुख्य वेबसाईटवरच दिसणार असल्याचे सुद्धा  सांगण्यात आले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी