30 C
Mumbai
Tuesday, August 2, 2022
घरएज्युकेशनCBSE बोर्डाने केला १० वीचा निकाल जाहीर

CBSE बोर्डाने केला १० वीचा निकाल जाहीर

टीम लय भारी

नवी दिल्ली : आज (दि. २२ जुलै २०२२) सकाळी CBSE बोर्डाचा (CBSE Board) १२ वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता दुपारी २ वाजता दहावीचा निकाल सुद्धा जाहीर करण्यात आला आहे. बऱ्याच दिवसांपासून प्रतिक्षेत असलेला सीबीएसई बोर्डाचा १० वीचा निकाल जाहीर झाला आहे. यंदाच्या वर्षी राज्य मंडळाच्या निकालापेक्षा CBSE बोर्डाचा निकाल हा उशिरा जाहीर करण्यात आला.

विद्यार्थी http://cbse.gov.in किंवा http://cbresults.nic.in या CBSE बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपला निकाल पाहू शकतात. या वर्षी २६ एप्रिल ते २४ मी या कालावधीत सीबीएसई बोर्डाकडून दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. तर यानंतर महाराष्ट्र बोर्डाच्या परीक्षा झाल्या होत्या. पण तरी सुद्धा महाराष्ट्र बोर्डाचा दहावी आणि बारावीचा निकाल हा सर्वात आधी जाहीर करण्यात आला होता.

यंदाच्या वर्षी २० लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी सीबीएसई बोर्डातून परिक्षेला बसले होते. कोरोना महामारीमुळे सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा या दोन टप्प्यात घेण्यात आल्या होत्या. सीबीएसई बोर्डाची दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा ही एप्रिल-मे या महिन्याच्या कालावधीत पार पडली होती. दरम्यान, CBSE बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत ९४.४० % विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

हे सुद्धा वाचा :

CBSE बोर्डाचा १२ वीचा निकाल जाहीर

राज्यातील शिष्यवृत्तीच्या परीक्षांची तारीख बदलली

MPSC मार्फत शिक्षक भरती घेण्याचा शिक्षण आयुक्तालयाने शासनाला दिला प्रस्ताव

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!