34 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeएज्युकेशनEducation : चंद्रकांतदादा पाटलांना गरज ‘डोळस’ अधिकाऱ्याची !

Education : चंद्रकांतदादा पाटलांना गरज ‘डोळस’ अधिकाऱ्याची !

राज्यातील सर्व महाविद्यालये व विद्यापीठांवर शैक्षणिक, प्रशासकीय व आर्थिक अनुदान या बाबींच्या माध्यमातून उच्च शिक्षण संचालनालयाचा अंकुश असतो. संचालनालयाचे संचालक हे संचालनालयाचे प्रमुख असतात. धनराज माने हे या पदावर कार्यरत आहेत. पण माने हे महाराष्ट्राच्या उच्च शिक्षण खात्यासाठी मोठी अडचण ठरले आहेत. चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) यांच्या रूपाने उच्च व तंत्र शिक्षण खात्याला ‘दादा’ मंत्री मिळालेला आहे. त्यामुळे त्यांनी उच्च शिक्षणात ‘लक्ष’ घालावे व तिथला अंधार नाहीसा करावा, अशी मागणी या क्षेत्रातील घटकांकडून केली जात आहे.

उच्च व तंत्र शिक्षण (Education) खात्याचे मंत्रीपद चंद्रकांतदादा पाटील यांना नुकतेच मिळाले आहे. पण उच्च शिक्षण खात्याची (Higher Education) अवस्था ‘आंधळं दळतंय, आणि कुत्रं पीठ खातंय’ अशी झाली आहे. या स्थितीवर ‘लय भारी’नेच सर्वप्रथम प्रकाश टाकला होता. पण मंत्रालयात बसलेल्या वरिष्ठांकडून उच्च शिक्षणातील आंधळ्या कारभाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसत आहे. चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) यांच्या रूपाने उच्च व तंत्र शिक्षण खात्याला ‘दादा’ मंत्री मिळालेला आहे. त्यामुळे त्यांनी उच्च शिक्षणात ‘लक्ष’ घालावे व तिथला अंधार नाहीसा करावा, अशी मागणी या क्षेत्रातील घटकांकडून केली जात आहे.

हे सुद्धा वाचा

Sujay Vikhe Patil : ‘सुजय विखे पाटलांचे प्रेम सनी लियोनी…’

Farmers protest : किमान आधारभूत किमतीसाठी पुन्हा एकदा शेतकरी देणार सरकारला टक्कर

Nitin Gadkari : नितीन गडकरींचा घरचा आहेर !

राज्यातील सर्व महाविद्यालये व विद्यापीठांवर शैक्षणिक, प्रशासकीय व आर्थिक अनुदान या बाबींच्या माध्यमातून उच्च शिक्षण संचालनालयाचा अंकुश असतो. संचालनालयाचे संचालक हे संचालनालयाचे प्रमुख असतात. धनराज माने (Dhanraj Mane) हे या पदावर कार्यरत आहेत. पण माने हे महाराष्ट्राच्या उच्च शिक्षण (Higher Education in Maharashtra) खात्यासाठी मोठी अडचण ठरले आहेत. त्यांचा कारभार वादग्रस्त आहे. त्यामुळे चार वर्षांपूर्वी तत्कालिन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी माने यांना विधिमंडळाच्या भर सभागृहात निलंबित करीत असल्याची घोषणा केली होती. पुढे या घोषणेची अंमलबजावणी झालीच नाही. त्यामुळे माने यांचा मनमानी कारभार सुरूच आहे.

धनराज माने (Dhanraj Mane) यांच्या कारभाराविषयी गंभीर तक्रारी असतानाच अलिकडे आणखी संकट ओढवले आहे. माने यांची दृष्टी पूर्णतः अधू झाली आहे. त्यांना डोळ्याने जवळपास काहीच दिसत नसल्यासारखी स्थिती आहे. याबाबत ‘लय भारी’ने सर्वप्रथम बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या.

सरकारी नोकरीत असलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला वयाची ५० वर्षे पूर्ण केल्यानंतर आरोग्य तपासणी करावी लागते. या तपासणीत तो कर्मचारी शारीरिकदृष्ट्या सदृढ असेल तरच त्याला नोकरीत नियमित करण्याची तरतूद आहे. पण धनराज माने यांच्या आरोग्य तपासणीचे प्रमाणपत्र घेण्याची तसदी मंत्रालयातील वरिष्ठ घेत नाहीत.

उच्च व तंत्र शिक्षण खात्यातील या आंधळ्या कारभारामुळे मोठीच पंचाईत झाली आहे. माने यांना कादगपत्रे व्यवस्थित वाचता येत नाहीत. स्वाक्षरी नीट करता येत नाही. धनादेशावर सुद्धा ते चुकीच्या ठिकाणी स्वाक्षरी करतात. त्यामुळे धनादेश बाऊन्स होतात.

त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी इतरांची मदत घ्यावी लागते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना एका परदेशी संस्थेसोबत करार झाला होता. मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत परदेशी पदाधिकारी व महाराष्ट्रातील अधिकारी यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या होत्या. या स्वाक्षरी करताना माने यांना इतरांनी मदत केली होती. अक्षरशः माने यांचा हात धरून स्वाक्षरी करण्याची ठिकाणे दाखवावी लागत होती.

विशेष म्हणजे, माने यांच्यामुळे उच्च शिक्षण खात्यात भ्रष्टाचाराचे थैमान माजले आहे. त्यामुळे माने यांची वैद्यकीय तपासणी करावी अशी लेखी मागणी शिक्षक आमदार नागो गाणार यांनी सरकारकडे केली आहे. पण गाणार यांच्या या पत्राला सुद्धा सरकारने केराची टोपली दाखविली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सर्व प्राध्यापक संघटनांनी सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. उच्च शिक्षण खात्याच्या प्रधान सचिवांना सुद्धा पत्र लिहिले आहे. धनराज माने यांच्या मनमानी कारभाराबद्दल या पत्रात सविस्तर लिहिले आहे. त्यांची आरोग्य तपासणी करावी, अशीही मागणी या पत्राद्वारे करण्यात आलेली आहे. तरी सुद्धा माने यांना झुकते माफ दिले जात असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी