28 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeएज्युकेशनलोकसेवा आयोगाच्या उत्तर तालिकांवरील हरकतीसाठी द्यावे लागणार शुल्क

लोकसेवा आयोगाच्या उत्तर तालिकांवरील हरकतीसाठी द्यावे लागणार शुल्क

टीम लय भारी

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने उत्तर तालिकांवरील हरकतींसाठी शुल्क आकारण्याबाबतची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यापुढे कोणत्याही गटातील परीक्षा झाल्यावर उत्तर तालिकांवर हरकती घेण्यासाठी परीक्षार्थी उमेदवाराला शुल्क द्यावे लागणार आहे. याबाबतची जाहिरात ट्विटरवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. शुक्रवार दि. १ जुलैला प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

उत्तर तालिकेवरील हरकती ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याकरीता रुपये 100/- प्रती हरकत(प्रश्न) + रुपये 44/- इतके शुल्क लागू करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. अतिरिक्त प्रश्नांसाठी आयोगाकडून ठरवण्यात आल्याप्रमाणे शुल्क आकारणी करण्यात येणार आहे. याची अंमलबाजवणी १ जुलैपासून करण्यात आली असून यापुढील सर्व परीक्षांमध्ये हे नियम लागू करण्यात येतील. दरम्यान, अनावश्यक हरकतींना आला घालण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सदर निर्णय घेण्यात आला आहे.

charges-will-have-paid-objections-mpsc-answer-sheets

हे सुद्धा वाचा :

राज्य सरकारकडून मेगा भरती; दीड हजार लिपिकांची पदे भरणार

महाराष्ट्रातील तरुणांना शासकीय सेवेत दाखल होण्याची सुवर्णसंधी !

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी