31 C
Mumbai
Tuesday, May 16, 2023
घरएज्युकेशनCBSE: 10वी-12वी परीक्षेत ChatGPTच्या वापरावर होणार कडक कारवाई!

CBSE: 10वी-12वी परीक्षेत ChatGPTच्या वापरावर होणार कडक कारवाई!

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षा आजपासून सुरू झाल्या आहेत. ह्या परीक्षा ५ एप्रिलपर्यंत चालणार आहेत. बॉर्डच्या आदेशानुसार, परीक्षा हॉलमध्ये मोबाइल आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे विशेषतः चॅटजीपीटीच्या वापरावर देखील सक्त बंदी घालण्यात आली आहे. मात्र याचे उल्लंघन केल्यास विद्यार्थ्यांना कडक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळच्या (CBSE) 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षा आज, 15 फेब्रुवारीपासून सुरू झाल्या असून या परीक्षा ५ एप्रिलपर्यंत चालणार आहे. बोर्डाने या परीक्षेसाठी देश-विदेशात 7 हजार 250 हून अधिक परीक्षा केंद्रे स्थापन केली आहेत. सीबीएसईने जारी केलेल्या नोटीसनुसार, देशभरातून यावर्षी 38 लाखांहून अधिक विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेला बसणार आहेत. त्यापैकी 21 लाख 86 हजार 940 विद्यार्थी 10वीच्या परीक्षेला बसणार आहेत, तर 16 लाख 96 हजार 770 विद्यार्थी 12वीच्या परीक्षेला बसणार आहेत.10वीची परीक्षा 16 दिवसांत संपणार आहे. तर बारावीची परीक्षा ३६ दिवस चालणार आहे. दरम्यान सकाळी 10.30 ते दुपारी 1.30 या वेळेत या परीक्षा पार पडणार आहेत.

परीक्षेपूर्वी बोर्डाने जारी केलेल्या सूचनांनुसार, परीक्षा हॉलमध्ये मोबाइल आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे विशेषतः चॅटजीपीटीच्या वापरावर सक्त बंदी घालण्यात आली आहे. बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण घेऊन जाण्याची परवानगी नाही. यामध्ये नव्याने प्रचलित झालेल्या ChatGPT द्वारे वापरलेली साधने देखील समाविष्ट आहेत. बोर्डाचा या मागचा हेतु असा की, विद्यार्थ्यांकडून परीक्षेत कोणताही गैर प्रकार घडू नये आणि अयोग्य मार्गांचा वापर होणार नाही याची खात्री करणे हा आहे.

विशेषतः चॅटजीपीटीच्या वापराचे संभाव्य समस्या लक्षात घेता, नवीन तंत्रज्ञानाच्या आगमनामुळे सर्वात जास्त धोका निर्माण झाला आहे तो शिक्षण क्षेत्राला. विद्यार्थी शैक्षणिक प्रकल्प, असाइनमेंट तयार करण्यासाठी या प्रणालीचा वापर करतात. त्यामुळे बोर्डाच्या परीक्षेच्या धर्तीवर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ChatGPT या प्रणालीच्या वापरावर सक्त बंदी घालण्यात आली आहे. मात्र याचे उल्लंघन केल्यास विद्यार्थ्यांना कडक कारवाईला देखील सामोरे जावे लागेल.

दरम्यान, विद्यार्थ्यांना कोणत्याही तणावाशिवाय परीक्षेला बसता यावे, परीक्षेदरम्यान कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये अशा अनेक गोष्टी लक्षात घेऊन सीबीएसई बोर्डाने केंद्रासाठी वेळापत्रक तयार केले आहे. या अनुषंगाने सर्व परीक्षा केंद्रांनी याबाबत कंबर कसून तयारी केली आहे.

हे सुद्धा वाचा : विद्यार्थ्यांनो सावधान! १०- १२वी परीक्षेत गैरप्रकार आढळल्यास होणार कठोर शिक्षा

महाराष्ट्र बोर्डाच्या अभ्यासक्रमाकडे पालकांची पाठ ; महापालिकेच्या ‘सीबीएससी’, ‘आयसीएससी’च्या ८६८ जागांसाठी चार हजारपेक्षा अधिक अर्ज

शिक्षण मंत्री दीपक केसरकरांच्या कार्यालयात सामान्य जनतेला मिळते अपमानास्पद वागणूक

ChatGPT म्हणजे काय?
चॅटजीपीटी हा मुळात व्हर्च्युअल रोबोट (चॅटबॉट) आहे, जो विविध प्रश्नांची उत्तरे देतो, लिहिण्याचं काम करतो, अस्खलितपणे संभाषण करतो आणि वैयक्तिक समस्यांवर सल्ला देखील देतो. उदाहरणार्थ, तो तुम्हाला ‘स्ट्रोगॅनॉफ’ कसा तयार करायचा हे शिकवू शकतो. तसंच, तुम्हाला नोकरी मिळवण्यासाठी, कविता लिहिण्यासाठी, शैक्षणिक पेपर्स लिहिण्यासाठी सल्ला देऊ शकतो. चॅटजीपीटी जवळजवळ 100 भाषांमध्ये उपलब्ध आहे. परंतु, या मॉडेलचं कार्यप्रदर्शन भाषेनुसार बदलतं. इंग्रजीत सर्वोत्तम काम करतं, असं आतापर्यंत तरी दिसू आले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी