31 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeएज्युकेशनपरदेशात शिकणाऱ्या मुलाला शिष्यवृत्ती न मिळाल्याने बापासमोर कर्जाचे डोंगर

परदेशात शिकणाऱ्या मुलाला शिष्यवृत्ती न मिळाल्याने बापासमोर कर्जाचे डोंगर

राज्य सरकारची शिष्यवृत्ती न मिळाल्याने परदेशात शिकणारे विद्यार्थी अडचणीत

परदेशात शिक्षणासाठी जाऊ नकोस, आपल्याकडे पैसे नाहीत, असे वडिलांनी मुलाला वारंवार सांगितले. मात्र राज्य सरकारची शिष्यवृत्ती मिळाली आहे. त्यामुळे शिक्षण आणि इतर खर्चाची काळजी नसेल अशी आशादायी बाब मुलाने बापाला सांगितली. प्रासंगिक उच्च शिक्षणासाठी राज्य सरकारची मुलाला शिष्यवृत्ती मिळाली, बापाने कर्ज काढून मुलाला उच्च शिक्षणासाठी अमेरिकेलाही पाठवले, मुलगा परदेशातही गेला; पण राज्य सरकारकडून शिष्यवृत्ती अद्यापही सुरू न झाल्याने परदेशात शिक्षण घेणारा मुलगा आणि इथे कर्ज काढलेला बाप दोघेही अडचणीत सापडले आहेत.

इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे 2018 पासून विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशातील उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिले जाते. मात्र, शासनाने शिष्यवृत्ती मंजूर करूनही ती न मिळाल्याने या विद्यार्थ्यांसमोर अनंत संकट अडचणी उभ्या राहिल्या आहेत. यंदा 50 विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे. मात्र त्यांचीही कहाणी यापेक्षा वेगळी नसणार.

मी जमीन गहाण ठेवून कर्ज काढले आणि मुलाला परदेशात पाठवले. सात महिने झाले, मुलगा परदेशात शिकत आहे. तिथल्या विद्यापीठाची फी आणि इतर मिळून महिन्याला त्याला 50 हजार खर्च येतो. त्याच्याकडे पैसेही नाहीत, त्यामुळे आता उधारी करून मी त्याला पैसे पाठवत आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला तर लवकरच रक्कम मिळेल, असे उत्तर अनेकदा मिळत असल्याची व्यथा एका पित्याने मांडली. यांनी एका वृत्तपत्राला याबाबत ही माहिती दिली आहे.

अद्याप शिष्यवृत्ती नाही?
पदव्युत्तर पदवी आणि पीएचडी अभ्यासक्रमासाठी QS आणि THE यांच्या सरासरी 200च्या आतील जागतिक रैंकिंग असलेल्या परदेशातील शैक्षणिक संस्थेत गुणवत्तेच्या आधारे प्रवेश मिळणाऱ्या एकूण 50 विद्यार्थ्यांना परदेशातील उच्च शिक्षणासाठी ही शिष्यवृत्ती दिली जाते. त्यानुसार 13 ऑक्टोबर 2022 रोजी शासन निर्णय निर्गमित करून या समाजातील 50 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला. निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेश मिळालेल्या परदेशातील शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेतला आणि ते शिक्षणासाठी परदेशात रवाना झाले, तिथे त्यांचे शिक्षणही सुरु झाले. मात्र शासनाने निर्णय घेऊनही अद्याप शिष्यवृत्ती सुरु न झाल्याने या विद्यार्थ्यासमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत.

हे सुद्धा वाचा: 

अखेर ITI विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनाचा प्रश्न मिटला; मंगलप्रभात लोढा यांनी केली मोठी घोषणा

डीजेच्या तीव्र आवाजामुळे कोमात गेलेल्या वयस्कर शिक्षकाचा मृत्यू

शाळेत मराठी सक्तीबाबत राज्य सरकारचा यू-टर्न !

Debt crisis facing father as son studying abroad, state government scholarship, Debt crisis facing father as son studying abroad does not get state government scholarship

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी