राज्यात शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा प्रश्न कायम चर्चेत असतो. या प्रश्नावर सरकारला कायम धारेवर धरण्यात येते, असे असताना आता शालेय शिक्षणमंत्री दीपक शेलार यांनी चांगली बातमी दिली आहे. आतापर्यंत शाळाबाह्य नऊ हजार मुलांना शाळेत आणले गेले, अशी माहिती दीपक केसरकर यांनी विधानसभेत दिली आहे.
राज्यांमध्ये ४६५० मुले आणि ४६७५ मुली शाळाबाह्य होत्या. शाळाबाह्य मुलांना शाळेत दाखल करण्याची मोहीम प्रत्येक वर्षी राबवली जाते. त्यानुसार यावर्षीही ती राबवली गेली आहे.आतापर्यंत नऊ हजार मुलांना शाळेत आणले गेले आहे. जी ३०० मुले शाळेत आणता येऊ शकली नाही ती विकलांग आहेत अथवा अन्य काही अडचणींमुळे ती दाखल होऊ शकली नाही, मात्र त्यांच्यासाठीही शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे केसरकर यांनी स्पष्ट केले.
हे सुद्धा वाचा
मणिपूर महिला अत्याचाराच्या मुद्द्यावर विधानसभा अध्यक्षांनी चर्चेस नकार दिल्याने काँग्रेसचा सभात्याग
मुंबईत मुसळधार पावसाचा हार्बर मार्गावरील लोकल सेवेला फटका
राज्य सरकारने राज्यातील कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी शिक्षण हक्क कायदा आणला. पण अनेकदा स्थलांतरित मजूर, गरीब नागरिक यांच्या मुलांना घरातील आर्थिक परिस्थितीने शाळा सोडावी लागते. एखादा मुलगा नापास झाल्यास तो शाळेत जात नाही. त्यामुळे राज्यात शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा प्रश्न गहन झाला होता. तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी शाळाबाह्य विद्यार्थी शोधण्याची मोहीम सुरू केली होती. तेव्हापासून शाळाबाह्य विद्यार्थ्यांनी शाळेत यावे यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.