30 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeएज्युकेशनDefense Journalism Course : होय! संरक्षण पत्रकारितेचा लवकरच कोर्स सुरू

Defense Journalism Course : होय! संरक्षण पत्रकारितेचा लवकरच कोर्स सुरू

संरक्षण पत्रकारितेत एक नवं पाऊल टाकून FINS इन असोसिएशन विथ डेक्कन एज्युकेशन सोसायटी (डीईएस), संरक्षण पत्रकारितेतील एक नवीन प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करीत असून विद्यार्थ्यांसाठी एका नव्या संधीचे दार त्यांनी उघडले आहे, याबाबत FINS ने अधिकृतपणे घोषणा केली असून लवकरच हा कोर्स सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

पत्रकारितेला लोकशाहीचा ‘चौथा स्तंभ’ म्हणून ओळखले जाते. या पत्रकारीतेत आता अनेक नवे कंगोरे निर्माण झाले असले तरीही त्यातील विश्वासार्हतेचा प्रश्न अजूनही संभ्रम वाढवत आहे. वेगवेगळ्या न्यूज बीट्सच्या माध्यमातून पत्रकारिता रंगीबेरंगी दिसत असली तरीही त्यातील आव्हाने सुद्धा तितकीच आहेत. या बीट्स मध्ये कायम वेगळं शोधून नाविण्यपूर्णतेने पत्रकारिता करणाऱ्यांसाठी आता एक नवी संधी उपलब्ध होणार आहे. FINS कडून संरक्षण पत्रकारितेचा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे, त्याबाबत त्यांनी एक कोर्स तयार केला असून या अभ्यासक्रमाच्या शुभारंभाचा कार्यक्रम येत्या शनिवारी पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी महत्त्वाच्या पाहुण्यांची उपस्थिती असणार आहे.

सदर कार्यक्रमाचा शुभारंभ शनिवार, दि. 20 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 11 वाजता कीर्ती कॉलेजमध्ये पार पडणार आहे. यावेळी व्हाइस अॅडमिरल ए आर कर्वे, पीव्हीएसएम, एव्हीएसएम, भारतीय नौदल (निवृत्त) यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, तसेच राष्ट्रीय सुरक्षा विश्लेषक आणि प्रसिद्ध पत्रकार श्री नितीन गोखले यावेळी सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

Defense Journalism Course : होय! संरक्षण पत्रकारितेचा लवकरच कोर्स सुरू

हे सुद्धा वाचा…

CBI : महाराष्ट्रात पुन्हा सुरू होणार सीबीआयचा सिलसिला

Shree Sevagiri Lecture Series : श्री सेवागिरी व्याख्यानमालेचे भव्य आयोजन

Manish Sisodia : मनीष सिसोदिया केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर

दरम्यान, संरक्षण पत्रकारितेत एक नवं पाऊल टाकून FINS इन असोसिएशन विथ डेक्कन एज्युकेशन सोसायटी (डीईएस), संरक्षण पत्रकारितेतील एक नवीन प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करीत असून विद्यार्थ्यांसाठी एका नव्या संधीचे दार त्यांनी उघडले आहे, याबाबत FINS ने अधिकृतपणे घोषणा केली असून लवकरच हा कोर्स सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी