28 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
Homeएज्युकेशन११ वीची पहिली प्रवेश यादी ३ ऑगस्टला जाहीर होणार

११ वीची पहिली प्रवेश यादी ३ ऑगस्टला जाहीर होणार

टीम लय भारी

मुंबई : नुकताच सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहार. त्यानंतर आता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला (Admission list) देखील सुरुवात करण्यात आली आहे. अकरावी प्रवेशाची पहिली यादी ३ ऑगस्ट २०२२ ला जाहीर करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांना २७ जुलैपर्यंत अर्जाचा पहिला भाग पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर २८ जुलैला तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. तर २८ जुलै ते ३० जुलै पर्यंत तात्पुरत्या गुणवत्ता यादीवर आक्षेप नोंदविता येणार आहे. ३ ऑगस्टला पहिली प्रवेश यादी जाहीर झाल्यानंतर ३ ऑगस्ट ते ६ ऑगस्टमध्ये विद्यार्थ्यांना आपले प्रवेश निश्चित करता येणार आहेत.

७ ते १७ ऑगस्ट या काळात दुसरी प्रवेश फेरी जाहीर करण्यात येईल. तर त्यानंतर २६ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर या कालावधीत अकरावी प्रवेशाची तिसरी फेरी घेण्यात येईल. ३० जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना विविध कोट्यांमधून प्रवेश घेण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. सीबीएसई बोर्डाचा निकाल उशिरा जाहीर झाल्याने यंदा अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला विलंब झाला आहे.

हे सुद्धा वाचा :

‘कारगिल विजय दिवस’ एक अविस्मरणीय ‘वीरगाथा’

शिक्षकांची अंधश्रद्धा; विद्यार्थिनीला वृक्षारोपण करण्यापासून रोखले

मंत्री मंडळाचा विस्तार न करताच शिंदे सरकारने घेतले ५०० पेक्षा अधिक निर्णय

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी