28 C
Mumbai
Tuesday, September 12, 2023
घरएज्युकेशनप्रणिता थोरातला उच्च शिक्षणासाठी जर्मन सरकारची फेलोशिप; जातीयता व लिंगभेदावर करणार संशोधन

प्रणिता थोरातला उच्च शिक्षणासाठी जर्मन सरकारची फेलोशिप; जातीयता व लिंगभेदावर करणार संशोधन

मुरबाड तालुक्यातील टोकावडे दुर्गम भागातील वैशाखरे या गावातील प्रणिता संजय थोरात हिला जर्मन सरकारकडून उच्च शिक्षणासाठी फेलोशिप मिळाली आहे. तिच्या या कामगिरीमुळे मुरबाड तालुक्यातून प्रणितावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. जर्मन सरकार पुरस्कृत ‘मार्टिन ग्राॅथ इनिशिएटिव्ह’ फेलोशिप जगभरातील जातीयता व लिंगभेद या विषयावर संशोधन करण्यासाठी तिला मिळाली आहे. जगभरात समतावादी समाज निर्मितीसाठी ती करीत असलेल्या संशोधनास अत्यंत महत्त्व आहे. या महत्वाच्या फेलोशिपसाठी प्रणिता थोरात हिने १५ जुलै २०२३ रोजी बर्लिन जर्मनीकडे प्रयाण केले आहे.

प्रणिता हिने आपले बी. ए. पर्यंतचे शिक्षण रुईया महाविद्यालय मुंबई येथे पूर्ण केले असून नुकतेच ‘सोशल वर्क दलित अँड ट्रायबल स्टडीज’ या विषयात टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स (TISS) मुंबई येथे एम.ए. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. आपले शिक्षण पूर्ण करीत असताना दलित संग्रहण पद्धतीच्या दिशेने या पुस्तकाचे प्रकाशन करता प्रकल्प व्यवस्थापक म्हणून तिने उत्कृष्ट काम केले आहे. सदर पुस्तकात ‘एक गोष्ट आपल्या गोष्टीची’ हे तिने लिहिलेले आर्टिकल प्रसिद्ध झाले आहे. या बाबतीत तिची दखल घेऊन बर्लिनमध्ये कार्यरत ‘ओयुन’ या संस्थेने तिला चर्चासत्रासाठी आमंत्रित केले होते.
प्रणिता ही रिपब्लिकन एम्प्लॉइज फेडरेशनचे शिक्षण विभागप्रमुख संजय थोरात यांची ती कन्या आहे. मुरबाड हा भातासाठी प्रसिद्ध आहे. या भागात शैक्षणिक संस्था पुरेशा नाही. पण गेल्या वर्षापासून मुरबाडचा दहावी, बारावीचा निकाल चांगला लागत आहे. उच्च शिक्षणाच्या फारशा सुविधा नसतानाही तालुक्यातील विद्यार्थी गरुड भरारी घेत आहेत.
हे सुद्धा वाचा

विधान सभेत शरद पवार गटातील फक्त 8 आमदार दिसले, व्हीप नेमका कुणाचा मानायचा? आमदारांना प्रश्न

शिंदे सरकार कॅसिनो सुरू करणार; पावसाळी अधिवेशनात विधायक मांडण्याची शक्यता

सिलेसिया डायमंड लीगमध्ये अविनाश साबळे 6 व्या स्थानी, पॅरिस ऑलिम्पिकसाठी ठरला पात्र

प्रणिताच्या गरुड भरारीस रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, रिपब्लिकन एम्प्लॉइज फेडरेशनचे आत्माराम पाखरे, रिपब्लिकन नेते भगवान पवार, री.ए. फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब शिंदे, पत्रकार संजय बोरगे, रिपाइंचे तालुकाध्यक्ष दिनेश उघडे यांनी तिच्या पुढील यशस्वी कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी