28 C
Mumbai
Sunday, December 8, 2024
Homeएज्युकेशनदहावीच्या निकालात मुलींनी मारली बाजी

दहावीच्या निकालात मुलींनी मारली बाजी

दहावीच्या निकालात कोकण विभाग अव्वल ठरलाय. नागपूर विभागाचा निकाल सर्वाधिक कमी लागलाय.याहीवेळेस बाजी मारत मुलींनी त्याचं शिक्षणातील स्थान आणखी बळकट केलेलं आहे. मुलींच्या टक्क्यात मोठ्याप्रमाणात वाढ झालेली दिसून आली आहे.

काही दिवसांपूर्वी बारावीचा निकाल लागला. आज दहावीचा निकाल लागला असून या दोन्ही निकालांमध्ये मुलींनी बाजी मारली आहे(In the results of class 10, girls beat the falcon). आणि सर्वात महत्त्वाची बाब ही की यंदा दहावीच्या निकालाच्या टक्केवारीत वाढ झालेली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी नुकताच दहावीचा निकाल जाहीर केलाय. विभागीय टक्केवारी देखील जाहीर करण्यात आलीये. यावेळी दहावीच्या निकालात कोकण विभाग अव्वल ठरलाय. नागपूर विभागाचा निकाल सर्वाधिक कमी लागलाय.

याहीवेळेस बाजी मारत मुलींनी त्याचं शिक्षणातील स्थान आणखी बळकट केलेलं आहे. मुलींच्या टक्क्यात मोठ्याप्रमाणात वाढ झालेली दिसून आली आहे. मुली नक्कीच मुलांना वरचढ ठरल्याआहेत. राज्याची दहावीच्या निकालाची टक्केवारी ९५.८१ टक्के  अशी आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दहावीच्या निकालाबद्दल सविस्तर माहिती दिलीये. मुलींचा निकाल हा ९७.२१ टक्के इतका लागला असून मुलांचा ९४.५६ टक्के इतका आहे. मुलांच्या आणि मुलींच्या निकालात २.६५ टक्क्यांची एकूण तफावत आहे. राज्यात कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल ९९ टक्के लागला आहे. सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा निकाल ९४.७३ टक्के आहे.

विभागनिहाय निकाल

पुणे – 96.44, नागपुर – 94.73, संभाजीनगर – 95.19, मुंबई – 95.83, कोल्हापूर – 97.45, अमरावती – 95.58, नाशिक – 95.28, लातूर – 95.27, कोकण – 99.01 याप्रमाणे विभागीय निकाल लागलाय. यामध्ये कोकण विभाग अव्वल ठरला असून सर्वात कमी निकाल हा नागपूर विभागाचा लागलाय. विशेष म्हणजे कोकण विभागात अशी एकही शाळा नाही, जिचा निकाल झिरो टक्के आहे.

अधिकृत संकेत स्थळ खालील प्रमाणे

१. https://mahresult.nic.in
२. http://sscresult.mkcl.org
३. https://sscresult.mahahsscboard.in
४. https://results.digilocker.gov.in
५. https://results.targetpublications.org

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी