34 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeएज्युकेशननोकरीची संधी !!! इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये दहावी/बारावीसाठी अप्रेंटिस भरती

नोकरीची संधी !!! इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये दहावी/बारावीसाठी अप्रेंटिस भरती

इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF), चेन्नईने इच्छुक उमेदवारांसाठी एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे ज्यात शिकाऊ पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहे. जाहिरातीनुसार, या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 782 रिक्त जागा भरल्या जातील. अर्ज प्रक्रिया ऑनलाइन स्वरूपाची आहे आणि या ऑनलाईन प्रक्रियेची शेवटची तारीख 30 जूनपर्यंत खुली राहील. या पदांसाठी इच्छुक असलेले पात्र उमेदवार इंटिग्रल कोच फॅक्टरीच्या अधिकृत वेबसाइट pb.icf.gov.in वर नोंदणी करू शकतात. वेबसाईटच्या होम पेजवर भरतीशी संबधित लिंकवर क्लिक करा. या लिंकवर नोंदणी केल्यानंतर उम्मेदवारांनी त्यांची वैयक्तिक माहीती, शैक्षणिक पात्रता अशी माहीती भरणे आवश्यक आहे.

या भरतीसाठी किमान शैक्षणिक पात्रतेची आवश्यकता 10वी / 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच जाहीरातीत संबधित क्षेत्रातील ITI पूर्ण करणे आवश्यक आहे. 30 जून 2023 पर्यंत उमेदवारांचे वय 15 ते 24 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. निवडलेल्या उमेदवारांना नवीन (10वी) पदांसाठी 6,000 रुपये स्टायपेंड मिळेल, तर नवीन (12वी) आणि माजी ITI म्हणून निवड झालेल्यांना प्रति महिना 7,000 रुपये स्टायपेंड दिले जाईल. प्रशिक्षणाच्या दुसर्‍या वर्षी 10 टक्के आणि तिसर्‍या वर्षी 15 टक्के स्टायपेंड वाढवण्यात येईल.

हे सुद्धा वाचा 

अरबी समुद्रात चक्रीवादळ; मुंबई, ठाण्यात पाऊस कधी पडणार ?

NIRF च्या रँकिंगमध्ये मद्रास आयआयटी सलग पाचव्या वर्षी अव्वलच

World Environment Day : या साध्या सोप्या गोष्टीतून देखील तुम्ही निसर्गाची हानी टाळू शकता

या भरतीप्रकीयेमध्ये अर्ज भरल्यानंतर उम्मेदवारांना 100 रूपये शुल्क भरावे लागते. अ.जाती, अ.जमाती, पी.डब्लु.डी आणि महिला प्रर्वगातील उमेदवारांना शुल्क भरण्यापासुन सुट देण्यात आली आहे. ही निवडप्रक्रिया तीन टप्प्यांत होणार असुन प्रथम लेखी परिक्षा होईल त्यानंतर मुलाखत घेतली जाईल मुलाखतीनंतर कागदपत्र पडताळणी होतील.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी