मुंबई विद्यापीठाच्या गरवारे व्यवसाय शिक्षण आणि विकास संस्थेत जोखीम व्यवस्थापन (रिस्क मॅनेजमेंट) चा 2 क्रेडिटचा ओपन इलेक्टिव्ह कोर्स सुरु केला जात आहे. जगात सातत्याने अनेक चुकीच्या आणि नुकसान होणाऱ्या घटना घडत आहे. यामध्ये साथीचे रोग, युद्धे, सायबर हल्ले, खोट्या बातम्या, पुरवठा साखळीतील व्यत्यय, प्रशासनातील अनियमितता, उद्योजकीय अपयश, उत्तराधिकाराचे नियोजन आणि प्रतिष्ठेचे नुकसान यांसारख्या अनेक घटनांचा समावेश आहे. (Learn risk management course at Mumbai University’s Garware Institute)
गरवारे व्यवसाय शिक्षण आणि विकास संस्थेत सुरु झाले सहा नवीन प्रमाणापत्र अभ्यासक्रम
याच सर्व प्रकारच्या घटनांच्या जोखमी समजून घेणे आणि त्यांचे व्यवस्थापन करणे हा आता केवळ एक व्यवसाय राहिलेला नाही, तर करीअरच्या मार्गावरील एक महत्वपूर्ण कौशल्य म्हणून याचे महत्व अधोरेखित होत आहे. म्हणूनच मुंबई विद्यापीठाच्या गरवारे संस्थेत हा अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यताप्राप्त या कोर्सेसमध्ये 300 हून अधिक जोखीम क्षेत्रांचा अभ्यास करता येणार आहे. (Learn risk management course at Mumbai University’s Garware Institute)
नुकताच गरवारे शिक्षण संस्था आणि युकेतील प्रतिष्ठित इन्स्टीट्यूट ऑफ रिस्क मॅनेजमेंट्स इंडिया एफिलिएट संस्थेशी शैक्षणिक सामंजस्य करार करण्यात आला आहे. यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र. कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे, गरवारे व्यवसाय शिक्षण आणि विकास संस्थेचे संचालक डॉ. केयुरकुमार नायक, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या अधिष्ठाता प्रा. कविता लघाटे, नवोपक्रम, नवसंशोधन आणि साहचर्य मंडळाचे संचालक डॉ, सचिन लढ्ढा, इन्स्टिट्यूट ऑफ रिस्क मॅनेजमेंटच्या वतीने सीईओ इयान लिव्हसी, आयआरएम इंडियाचे सीईओ हर्ष शाह, संचालक राहूल पारेख, कोशा पारेख, शैलेश हरिभक्ती आणि एनक्युब इथिकल्सचे एमडी मेहूल शाह आदी उपस्थित होते. (Learn risk management course at Mumbai University’s Garware Institute)
मुंबई विद्यापीठाने जाहीर केल्या हिवाळी सत्राच्या परीक्षांच्या तारखा
या कराराच्या अनुषंगाने मुंबई विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील कोणत्याही महाविद्यालयात तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, कायदा, वित्त, व्यवसाय अभ्यास, उद्योजकता, विपणन अशा अनुषंगिक विषयातील पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेत असलेले विद्यार्थी या अभ्यासक्रमास प्रविष्ठ होऊ शकतील. त्याचबरोबर एचआर, सप्लाय चेन, फायनान्स, ऑडिट, गव्हर्नन्स, प्रोक्योरमेंट, ब्रँडिंग अशा अनुषंगिक क्षेत्रात काम करीत असलेल्या व विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलेल्या माजी विद्यार्थ्यांना सुध्दा जोखीम व्यवस्थापनातील उच्च कौशल्य प्राप्तीसाठी नोंदणी करता येईल. (Learn risk management course at Mumbai University’s Garware Institute)
या शैक्षणिक सामंजस्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे जोखीम व्यवस्थापनाचे 2 क्रेडिटच्या या ओपन इलेक्टिव्ह कोर्समुळे जोखीम व्यवस्थापनातील अत्याधुनिक ज्ञान आणि कौशल्ये प्राप्त करण्यास मदत होणार असून, त्यांना वेगाने बदलणाऱ्या जागतिक व्यवसायाच्या परिप्रेक्ष्यातील विविध विषयातील ज्ञानार्जन करता येणार असल्याने या कराराचे महत्व अधोरेखित होणार असल्याचे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले. (Learn risk management course at Mumbai University’s Garware Institute)
या ऐतिहासिक शैक्षणिक सामंजस्यामुळे विद्यार्थ्यांना व्यावसायिक, व्यावसायिक नेतृत्व, सल्लागार, उद्योजक अशा अनुषंगिक क्षेत्रातील कौशल्यवृद्धीसाठी मदत होणार आहे. त्याचबरोबर कृत्रिम बुद्धीमत्ता, हवामान, पुरवठा साखळी, भू-राजकीय आणि प्रकल्प व्यवस्थापन यांसारख्या उदयोन्मुख क्षेत्रांतील आव्हानांवर मात करणे आणि अशा आव्हांनाना आत्मविश्वासाने संधीमध्ये रुपांतर करण्याचे कौशल्यही विद्यार्थ्यांना मिळू शकणार असल्याचा आशावाद इन्स्टिट्यूट ऑफ रिस्क मॅनेजमेंटचे सीईओ इयान लिव्हसी यांनी व्यक्त केला.(Learn risk management course at Mumbai University’s Garware Institute)
या शैक्षणिक सामंजस्यामुळे मुंबई विद्यापीठातील विद्यार्थी उद्योग, भूमिका आणि जबाबदाऱ्यांच्या पलीकडील आवश्यक ज्ञानाने सुसज्ज होणार असल्याचा आशावाद या कोर्सच्या लॉन्चिंगच्या वेळी आयआरएम इंडियाचे सीईओ हर्ष शाह यांनी व्यक्त केला. (Learn risk management course at Mumbai University’s Garware Institute)
या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून विद्यार्थ्यांना अध्ययन साहित्य, अभ्यासक्रमाचे व्हिडिओ, शिक्षकांमार्फत एआय-सक्षम शैक्षणिक सहाय्य आणि तीन महिन्यांसाठी आयआरएमच्या ऑनलाइन लर्निंग पोर्टलवर प्रवेश मिळणार आहे. 15 ऑक्टोबर 2024 पासून https://www.gicededu.co.in/irm-mumbai-university-global-enterprise-risk-management-2-credit-course.php या लिंकवर विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी नोंदणी करू शकतील. (Learn risk management course at Mumbai University’s Garware Institute)