28 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
Homeएज्युकेशनमहादेव जानकर यांच्या एका निर्णयाने 432 जणांच्या घरी दिवाळी साजरी

महादेव जानकर यांच्या एका निर्णयाने 432 जणांच्या घरी दिवाळी साजरी

टीम लय भारी

मुंबई : माजी पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांच्या सुचनेने 435 पशुसंवर्धन अधिकाऱ्यांची पदे तात्काळ भरली जाणार आहेत. (Mahadev Jankar Saheb’s decision to celebrate Diwali in the homes of 432 people)

हे निकाल आठ ऑक्टोबर रोजी लागले. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येनंतर प्रशासनाला जाग आली व उर्वरित निकाल लागत आहेत.

शिवसेनेच्या प्रयत्नांना यश : जावलीत नळ पाणीपुरवठा योजनांसाठी निधी मंजुर

माझी वसुंधरा अभियानात पाचगणी नगरपालिका ठरली मानकरी

जानकरांनी आदेश देऊन सुद्धा निकाल वेळेवर लागत नव्हते. दरम्यान सरकार बदलले व युतीचे सरकार आले. या काळात अधिकाऱ्यांची नेमणूक होत नव्हती. मोठ्या संख्येने विद्यार्थी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरून सरकारचा निषेध करत होते.

त्याच कालावधीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष व माजी मंत्री महादेव जानकर साहेब यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पत्र पाठवून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत प्रलंबित असणाऱ्या परीक्षांचे निकाल तात्काळ लावण्यात यावे असा विनंती वजा इशाराही दिलेला होता.

शासन दरबारी वाढत असलेल्या रेट्यामुळे महाविकास आघाडी सरकार खडबडून जागे झाले व महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत प्रलंबित असलेल्या सर्व परीक्षांचे निकाल तात्काळ लावण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. त्याच पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाची प्रसिद्ध करण्यात आलेली 2019 सालची प्रलंबित जाहिरातचा निकाल लागला आहे.

आज 432 लोकांच्या घरी आनंदित वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न माजी पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय विभाग मंत्री महादेव जानकर यांनी केलेला आहे याची प्रचिती आता येऊ लागलेली आहे. काही नवनियुक्त अधिकाऱ्यांनीही मान्य केलेले आहे की 2019 ला जानकर यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून जाहिरात प्रसिद्ध करून सुशिक्षित बेरोजगार तरुणांना एक प्रकारे संधी देण्याचे काम केलेले आहे. त्यांच्या काळामध्ये पशुसंवर्धन विभागामध्ये अमुलाग्र बदल झालेले आहेत.

सातारच्या जान्हवी यांनी सिद्धासन आसनमध्ये केला 5 तासाचा नवा विश्वविक्रम

https://www.lokmat.com/pune/are-mahadev-jankar-and-gopichand-padalkar-against-dhangar-reservation-anna-danges-question-a727/

त्याच काळामध्ये भारत सरकारने देशामधील उत्कृष्ट विभाग म्हणून पशुसंवर्धन विभागास पुरस्कारही प्रदान केलेला आहे. तसेच नवीन काही योजना सुरू ही करण्यात आलेल्या आहेत. ज्या महाविकास आघाडी सरकारच्या काळांमध्ये ही सुरू आहे त्यामध्ये महामेष योजनेसारखी महत्त्वपूर्ण योजनाही आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी