30 C
Mumbai
Thursday, May 18, 2023
घरएज्युकेशनकॉपी बहाद्दरांनो सावधान; 10 वी,12 वी परीक्षांबाबत सरकारने उचलले 'हे' पाऊल!

कॉपी बहाद्दरांनो सावधान; 10 वी,12 वी परीक्षांबाबत सरकारने उचलले ‘हे’ पाऊल!

राज्यात 10 वी व 12 वीच्या परिक्षा केंद्रावर होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी पूर्ण राज्यात “कॉपीमुक्त अभियान” राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात आज कॉपीमुक्त अभियानाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय झाला. उपमुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी यांनी यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अभियानाबाबतचे सादरीकरण केले. क़ॉपीमुक्त अभियाना मुळे विद्यार्थ्यांना आता अर्धा तास लवकर परिक्षा केंद्रावर हजर व्हावे लागणार आहे. तसेच, पोलीस बंदोबस्त, संवेदनशील परीक्षाकेंद्रांवर आवश्यकते नुसार चित्रीकरण देखील करण्यात येणार आहे. (Maharashtra Government will implement copy free campaign to stop malpractice at 10th, 12th examination centers)

या अभियानात राज्याचा “नोडल अधिकारी” म्हणून शिक्षण आयुक्त यांना व प्रत्येक जिल्हाधिकारी यांना तसेच “समन्वयक अधिकारी” म्हणून माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना नियुक्त करण्यात आले आहे. तसेच “कॉपीमुक्त अभियान”राबविण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी व सर्व जिल्हा प्रशासनाने एकत्रित काम करावे. यासंदर्भात जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन जनजागृती करावी.परीक्षेला प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरु होण्याच्या प्रत्यक्ष वेळेपूर्वी अर्धा तास अगोदर हजर राहण्याबाबत विद्यार्थ्यांना सूचना देण्यात याव्यात. संवेदनशील समजल्या जाणाऱ्या परीक्षा केंद्रांवर आवशक्यतेनुसार चित्रीकरण करण्यात यावे असे ठरले.

जनजागृती मोहिम- शिक्षक, मुख्याध्यापक, शैक्षणिक संस्थांचे प्रमुख यांच्या कार्यशाळा आयोजित करणे. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, कार्यकारी अधिकारी व जिल्हा परिषद यांची जिल्हा दक्षता समिती नियुक्त करणे. माध्यमांव्दारे शाळा आणि पालकांशी संवाद साधणे यातून जनजागृती करण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा

IAS भूषण गगराणी यांचे मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षार्थींना दिल्या टीप्स !

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी ; गैरवर्तन केल्यास पाच परीक्षांसाठी निलंबन

MPSC बाबत मोठी अपडेट, नवी परीक्षापद्धत २०२५ पासून लागू करण्यास सरकार राजी

पोलीस बंदोबस्त- याशिवाय पोलीस बंदोबस्तावरही भर देण्यात येणार आहे. 50 मीटरच्या आत अनधिकृत व्यक्तीना प्रवेश नाही. अतिसंवेदनशील, संवेदनशील, सर्वसाधारण असे परीक्षा केंद्रांचे वर्गीकरण करण्यात यावे. कलम 144 अंतर्गत प्रतिबंधकात्मक आदेश देण्यात यावेत. 50 मीटरच्या आतील सर्व झेरॉक्स दुकाने बंद ठेवण्याचे देखील बंधन असणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी