28.9 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeएज्युकेशनबारावी परीक्षेत पावने दोन लाख विद्यार्थ्यांना 35 ते 45 टक्के गुण; सव्वा...

बारावी परीक्षेत पावने दोन लाख विद्यार्थ्यांना 35 ते 45 टक्के गुण; सव्वा लाख विद्यार्थी डिस्टींगशन मध्ये

महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेतल्या जाणाऱ्या १२ वी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. राज्यातून एकुन 14,16,371 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. त्यापैकी 12,92,468 विद्यार्थी 12 वी परीक्षेत पास झाले आहेत. यंदा उत्तीर्ण विद्यार्थ्यांची एकण टक्केवारी 91.25 टक्के एवढी आहे. उत्तीर्ण झालेल्या एकुण विद्यार्थ्यांपैकी १ लाख ३१ हजार ५६१ विद्यार्थ्यांना ७५ टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. तर १ लाख ७६ हजार ७६३ विद्यार्थ्यांना ३५ टक्के ते ४५ टक्के गुण मिळाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालात 2.97 टक्के घट झाली आहे.

गेल्यावर्षी सन 2022 साली बारावीचा निकाल 94.22 टक्के लागला होता. यंदा बारावीचा निकाल 91.25 टक्के लागला आहे. गेल्यावर्षी विद्यार्थ्यांना परीक्षेचा पेपर सोडविण्यासाठी वाढीव वेळ देण्यात आला होता. मात्र यंदाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना वाढीव वेळ देण्यात आला नव्हता. तसेच परीक्षा 100 टक्के अभ्यासक्रमावर घेण्यात आली होती, त्यामुळे निकाल गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

बारावीचा निकाल जाहीर, कोकण विभाग अव्वल; मुंबई विभागाचा सर्वात कमी निकाल

आईचं कलेक्टर होण्याच स्वप्न अधुरे राहिले: मुलाने युपीएससीत मिळवले दमदार यश

भारतीय आयटी कंपन्यांचे कॅम्पस हायरिंग 40 टक्क्यांनी घटणार!

बारावीच्या निकालात यंदा कोकण विभाग अव्वल आहे कोकण विभागाचा निकाल 96.25 टक्के इतका लागला आहे. त्याखालोखाल पुणे विभाग दुसऱ्या स्थानी असून पुणे विभागाचा निकाल 93.34 टक्के इतका आहे. तर तिसऱ्या स्थानावर कोल्हापूर विभाग असून 93.28 टक्के इतका निकाल कोल्हापूर विभागाचा लागला आहे. अमरावती विभागाचा निकाल 92.25 टक्के लागला आहे. औरंगाबाद विभागाचा निकाल 91.85 टक्के लागला आहे. नाशिक विभागाचा निकाल 91.66 टक्के लागला आहे. लातूर विभागाचा निकाल 90.37 टक्के लागला आहे. तर सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा असून 88.13 टक्के इतका मुंबई विभागाचा निकाल लागला आहे.

12 वीचा गेल्या पाच वर्षांचा निकाल 

2018 – 88.41 टक्के
2019 – 85.88 टक्के
2020 – 90.66 टक्के
2021 – 99.63 टक्के
2022 – 94.22 टक्के

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी