27 C
Mumbai
Sunday, March 19, 2023
घरएज्युकेशनविद्यार्थ्यांनो सावधान! १०- १२वी परीक्षेत गैरप्रकार आढळल्यास होणार कठोर शिक्षा

विद्यार्थ्यांनो सावधान! १०- १२वी परीक्षेत गैरप्रकार आढळल्यास होणार कठोर शिक्षा

मुले जसजशी मोठी होतात वरच्या वर्गात जातात तसतसा त्यांचा कॉपी करण्याचा आत्मविश्वास वाढत जातो. परीक्षेत अनेकदा गैरप्रकार करून पास होता येते या विषयीचा विश्वास विद्यार्थ्यांमध्ये वरचे वर वाढत चालला आहे. याच परंपरेला आळा घालण्यासाठी शिक्षण मंडळाने 10वी आणि 12वीच्या परीक्षेतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. यावर्षी इयत्ता 10वी-12वी (SSC & HSC)च्या परीक्षेत कोणताही विद्यार्थी डमी विद्यार्थी म्हणून आढळून आल्यास विभागीय मंडळ थेट संबंधित विद्यार्थ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे बोर्डाने गैरप्रकारांसाठी शिक्षेची यादी देखील जाहीर केली आहे. (Malpractice in 10th-12th examination will result in severe punishment)

दहावी-बारावी परीक्षेसाठी यापुढे जर कोणाही विद्यार्थ्यांकडून परीक्षेला डमी विद्यार्थी बसलेला आढळून आला तर विभागीय मंडळाकडून संबंधित विद्यार्थ्यावर थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. दहावी आणि बारावी परीक्षेतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी मंडळाने यावर्षी कडक पावले उचलली असून गैरमार्ग अवलंबल्यास होणाऱ्या शिक्षेची यादीच जाहीर केली आहे.

यंदा मंडळाकडून गैरप्रकार रोखण्यासाठी कडक कारवाई करण्यात येणार असून परीक्षेपूर्वी आणि प्रात्यक्षिक परीक्षांच्या काळात शिक्षासूचीचे सामूहिक वाचन विद्यार्थ्यांसमोर करणे, शक्य असल्यास शिक्षासूचीची प्रत प्रत्येक विद्यार्थ्याला देण्याच्या सूचना शिक्षण मंडळाने शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना दिल्या आहेत. या सूचनांचे सर्व विद्यार्थ्यांकडून काटेकोर पालन व्हावे असेही मंडळाने म्हटले आहे.

काय होणार कारवाई?

■ परीक्षेसाठीच्या अर्जामध्ये खोटी माहिती भरल्यास : विद्यार्थ्याला परीक्षेत प्रतिबंधित करणे. संपादणूक (इव्हॅल्यूएशन) रद्द करणे.

■ खोटी वैद्यकीय प्रमाणपत्रे दाखवून सवलत घेणे : परीक्षेला प्रतिबंधित करणे, संपादणूक रद्द करणे, पोलिसात गुन्हा दाखल करणे.

■ परीक्षेला डमी विद्यार्थी बसविणे : संपादणूक रद्द करणे, फौजदारी गुन्हा दाखल करणे.

■ प्रश्नपत्रिकांची चोरी, विकणे किंवा प्रश्नपत्रिका व्हायरल करणे: परीक्षेची संपादणूक रद्द करून पुढील ५ परीक्षा देण्याच्या वर्षासाठी प्रतिबंधित करणे, सायबर कायद्यानुसार गुन्हा दाखल करणे.

■ परीक्षेवेळी पॅडवर, हातावर, शरीराच्या कुठल्याही भागावर लिहिणे, चिट्ठी सापडणे : संबंधित विषयाची संपादणूक रद्द करणे.

हे सुद्धा वाचा :

CBSE Board Exam 2023 : सीबीएसई बोर्ड परीक्षेची तारीख जाहीर, वाचा सविस्तर…

MPSC: ग्रामीण भागातील १३ हजार पदभरतीचा घोळ सुरूच; चार वर्षांपासून तिढा कायम

MPSC बाबत मोठी अपडेट, नवी परीक्षापद्धत २०२५ पासून लागू करण्यास सरकार राजी

दहावी परीक्षेचे प्रवेशपत्र होणार उपलब्ध

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र सोमवार, ६ फेब्रुवारीपासून ऑनलाइन उपलब्ध होणार आहे. https://www.mahasscboard.in/ या संकेतस्थळावर शाळा लॉगिनमध्ये प्रवेशपत्र उपलब्ध करून दिले जाईल. प्रवेशपत्र डाऊनलोड करून त्यावर मुख्याध्यापकांचा शिक्का मारून, स्वाक्षरी करून प्रत विद्यार्थ्यांना द्यावी. प्रवेशपत्रात विषय माध्यम बदल असल्यास त्या दुरुस्ती शाळांनी विभागीय मंडळात जाऊन करावयाच्या आहेत. प्रवेशपत्रावरील छायाचित्र, स्वाक्षरी, विद्यार्थ्यांचे नाव या संदर्भातील दुरुस्ती शाळांनी त्यांच्या स्तरावर करून त्याची प्रत विभागीय मंडळात सादर करायची आहे. प्रवेशपत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास पुन्हा प्रत घेऊन त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत, असा शेरा नमूद करावा. छायाचित्र सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्यांचे छायाचित्र चिकटवून मुख्याध्यापकांनी शिक्का मारून स्वाक्षरी करायची आहे, असे मंडळाच्या सचिव अनुराधा ओक (Anuradha Oak) यांनी नमूद केले आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी