32 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
Homeएज्युकेशनMPSC Exam: एमपीएससीच्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी; या परीक्षांच्या तारखा जाहीर

MPSC Exam: एमपीएससीच्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी; या परीक्षांच्या तारखा जाहीर

एमपीएससीने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, आयोग राज्य वन सेवा २०२२ ची मेन्स परीक्षा १८ मार्च २०२३ रोजी घेण्यात येणार आहे.तर महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवाची मुख्य परीक्षा २५ मार्च २०२३ रोजी होणार आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) ने २०२२-२३ या वर्षात घेण्यात येणाऱ्या प्रमुख् परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या अंतर्गत महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा, विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा आणि इतर परीक्षा मार्च-एप्रिलमध्ये घेण्यात येणार आहेत. एमपीएससीने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, आयोग राज्य वन सेवा २०२२ ची मेन्स परीक्षा १८ मार्च २०२३ रोजी घेण्यात येणार आहे.तर महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवाची मुख्य परीक्षा २५ मार्च २०२३ रोजी होणार आहे.

हे सुद्धा वाचा —

Deepak Kesarkar : शालेय जीवनात योगाभ्यास आणण्याबाबत विचार; शिक्षणमंत्री दिपक केसरकरांचे सुतोवाच

Women Empowerment : कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे करिअरला ब्रेक? अशा महिलांसाठी आनंदाची बातमी!

Mumbai News : डोंबिवलीत रंगलेला ‘मनी हाईस्ट’सारख्या चोरीचा थरार; पोलिसांनी सापळा रचत केली आरोपींना अटक

महाराष्ट्र इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग सर्व्हिस मेन्सची परीक्षा २ एप्रिल २०२३ रोजी होईल. मेकॅनिकल अभियांत्रिकी सेवा परीक्षा ९ एप्रिल २०२३ रोजी होईल. आयोगाने जाहीर केलेल्या तारखांमध्ये काही परिस्थितीत बदलू होऊ शकतो. त्यामुळे उमेदवारांनी एमपीएससीच्या संकेतस्थळावर परीक्षांच्या तारखांबाबत पडताळणी करावी. जे उमेदवार या परीक्षेला बसणार आहेत ते एमपीएससीचे अधिकृत संकेतस्थळ mpsc.gov.in वर जाऊन तारखांची पडताळणी करु शकतात.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी