26 C
Mumbai
Sunday, March 19, 2023
घरएज्युकेशनMPSC बाबत मोठी अपडेट, नवी परीक्षापद्धत २०२५ पासून लागू करण्यास सरकार राजी

MPSC बाबत मोठी अपडेट, नवी परीक्षापद्धत २०२५ पासून लागू करण्यास सरकार राजी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) यंदापासून परीक्षा पद्धतीमध्ये (new exam system) बदल केल्यामुळे या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडाला होता. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्याधर्तीवर वर्णणात्मक पद्धत एमपीएससीने देखील लागू केली होती. मात्र या तडकाफडकीच्या निर्णयामुळे परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली होती. ही पद्धती २०२५ पासून लागू करावी अशी मागणी विद्यार्थी करत होते. तसेच सत्ताधारी आणि विरोधीपक्षातील अनेक नेत्यांनी देखील ही नवीन पद्धती २०२५ पासून लागू करण्याची मागणी सरकारकडे केली होती. अखेर सरकारने ही मागणी माण्य करत एमपीएससीतील नवे नियम २०२५ सालापासून लागू करण्याचा निर्णय मंगळवारी (दि.३१) रोजी घेतला. आता सरकार एमपीएससीकडे याबाबत विनंती करणार असून लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. (MPSC Big update Govt agrees implement new exam system from 2025)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना विद्यार्थ्यांच्या अडचणी सांगण्यात आल्या. या निर्णयामुळे अभ्यासाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना नव्याने पुन्हा अभ्यासाची तयारी करावी लागेल. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते. याबाबत देखील विद्यार्थ्यांनी आपली कैफीयत मांडली होती. तसेच सत्ताधारी आणि विरोधीपक्षातील अनेक नेत्यांनी देखील या गोष्टीकडे सरकारचे लक्ष वेधले होते. त्यानंतर मंगळवारी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये एमपीएससीचे नवे नियम २०२५ सालापासून लागू करण्याची मागणी माण्य करण्यात आली. सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला देखील यश आले असून त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यानिर्णयाला तत्वतः मान्यता दिली आहे.

हे सुद्धा वाचा

MPSC: ग्रामीण भागातील १३ हजार पदभरतीचा घोळ सुरूच; चार वर्षांपासून तिढा कायम

MPSC Exam: एमपीएससीच्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी; या परीक्षांच्या तारखा जाहीर

MPSC Result : गरीबीवर मात करत मुलगी बनली ‘क्लास वन’ ऑफिसर 

आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे सरकार नवी नियमावली २०२५ सालापासून लागू करण्याबाबत विनंती करणार असून याबाबत लवकरच अधिकृत घोषणा देखील केली जावू शकते. एमपीएससी अंतर्गत होणाऱ्या परीक्षांची लाखो विद्यार्थी तयारी करत आहेत. गेली दोन वर्षे कोरोनाकाळात गली. त्यानंतर आता विद्यार्थी पून्हा जोमाने अभ्यासाला लागले आहेत. त्यात आयोगाने परीक्षापद्धतीत बदल केल्यामुळे या विद्यार्थ्यांना पून्हा सुरुवातीपासून तयारी करावी लागणार आहे. त्यामुळे आयोगाने नवी नियमावली २०२५ सालापासून लागू करावी अशी मागणी केली जात होती.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी