34 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeएज्युकेशनएमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे नुकसान नको; पटोलेंनी केली 'ही' मागणी

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे नुकसान नको; पटोलेंनी केली ‘ही’ मागणी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC Syllabus) परीक्षा पद्धतीत बदल करून त्याची अंमलबजवणी पुढील वर्षापासून म्हणजे २०२३ पासून करण्याच्या निर्णयामुळे लाखो विद्यार्थ्यांना फटका बसू शकतो. विद्यार्थ्यांचे हित विचारात घेऊन नवी पद्धत २०२३ पासून लागू करण्याऐवजी २०२५ पासून लागू करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे.

यावेळी बोलताना पटोले म्हणाले, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) धर्तीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने केलेल्या परीक्षा पद्धतीच्या बदलाचे आकलन करण्यासाठी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ देणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना जर वेळ मिळाला नाही तर लाखो विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ण होण्यात या नवीन पद्धतीने अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना वेळ मिळाला तर विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करण्यास वेळ मिळेल आणि त्यांचे एमपीएससी परीक्षेतून अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण होण्यास मदतच होईल. याचा सारासार विचार करून दोन वर्षांनंतर नवीन अभ्यासक्रम लागू करावा.
यावेळी बोलताना पटोले म्हणाले, नागपूरमध्ये दोन-तीन वर्षांच्या कालावधीनंतर हिवाळी अधिवेशन होत आहे. मात्र ते केवळ दोन आठवड्यांचेच ठेवण्यात आले आहे. विदर्भाच्या प्रश्नांचा विचार करून हे अधिवेशन किमान तीन आठवडे तरी घ्यावे, अशी विरोधी पक्षाने मागणी केली होती. परंतू सरकारने मात्र त्याकडे लक्ष दिले नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात असताना मात्र हिवाळी अधिवेशन एक महिन्याचे घ्यावे अशी मागणी करत असत. आज ते सत्ताधारी आहेत, उपमुख्यमंत्री आहेत मग हिवाळी अधिवेशन केवळ दोन आठवड्यांचेच का? एक महिन्याचे का घेत नाहीत? असा सवाल देखील त्यांनी केला.
हे सुद्धा वाचा

मुख्यमंत्रीपद घालवणारे नागपूर अधिवेशन; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कामाख्या पूजा पावणार का?

हिवाळी अधिवेशन : राज्यपाल कोश्यारी, मंत्री चंद्रकांत पाटील यांना हटवा, विरोधकांचा चहापानावर बहिष्कार

जालन्यात भाजपच्या कार्यकर्त्यांची विकृती; आंदोलनात मुलाचे ओढले गुप्तांग, जबरदस्ती करायला लावली लघुशंका

पटोल म्हणाले, विदर्भाच्या प्रश्नांना फडणवीस यांना न्याय द्यायचा नाही का? भाजपा आणि फडणवीस यांना विदर्भातील जनतेची मते फक्त निवडणुका जिंकण्यासाठी हवी आहेत, त्यांच्या विकासाच्या प्रश्नावर अधिवेशन एक महिना का घेत नाहीत? असे सवाल विचारत ‘क्या हुआ तेरा वादा’? या फिल्मी डॉयलॉगमधून पटोले यांनी फडणवीस यांना त्यांच्या विधानाची नाना पटोले यांनी आठवण करून दिली.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी