34 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeएज्युकेशनएमपीएससीच्या तांत्रिक घोळामुळे उच्च पत्रकारिता पदवीधर अर्जाला मुकले; पुन्हा जाहिरात प्रसिद्ध करण्याची...

एमपीएससीच्या तांत्रिक घोळामुळे उच्च पत्रकारिता पदवीधर अर्जाला मुकले; पुन्हा जाहिरात प्रसिद्ध करण्याची मागणी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) वतीने माहिती व जनसंपर्क विभागातील विविध पदांकरिता जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यासाठी अर्ज करण्याची मुदत देखील सोमवारी (दि.२३) रोजी संपली. मात्र या पदासाठी पदव्यूत्तर पदविधारक, अनुभव असलेल्या अनेक उमेदवारांना अर्ज भरताना तांत्रिक अडचणीमुळे अर्ज भरता न आल्यामुळे त्यांच्यामध्ये प्रचंड असंतोषाची भावना निर्मान झाली आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे मंत्रालय मुख्य संपर्कप्रमुख नितीन जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना या प्रकरणात लक्ष घालून ही जाहिरात पू्न्हा प्रसिद्दध करावी अशी मागणी केली आहे. (MPSC technical glitch Higher Journalism graduate Candidates application missed; Request for republishing of advertisement)

ही जाहिरात जाणून बुजून ठराविक उमेदवारांसाठी नातेवाईक, आप्तेष्ट यांच्यासाठी केलेले भरती नियोजन आहे असे दिसते, असा आरोप नितीन जाधव यांनी केला आहे. जिल्हा माहिती अधिकारी, माहिती संचालक, वरिष्ठ सहाय्यक संचालक पदाची जाहिरातीसाठी केवळ डिप्लोमाधारक पदवीधर असाल तरच एमपीएससीच्या ऑनलाईन वेबसाईटवर अर्ज अपलोड होत होता. बीजे. एम जे. उच्चशिक्षित अनुभवी उमेदवारांचे अर्जच स्विकारले जात नव्हते. एमपीएससीला का नको उच्च शिक्षित अनुभवी जिल्हा माहिती अधिकारी, माहिती संचालक, सहाय्यक संचालक? असा सवाल करतानाच एमपीएससी नेमकं करतय काय.. असा सवाल करत? दाल मे बहुत कुछ काला है. असे नितीन जाधव यांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे नुकसान नको; पटोलेंनी केली ‘ही’ मागणी

एमपीएससीच्या जाहिरातीत ऑनलाईन त्रुटी, पदवीधरांचा जीव टांगणीला, नेमकं प्रकरण काय?

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे नुकसान नको; पटोलेंनी केली ‘ही’ मागणी

अनुभवी उच्चशिक्षित वार्ताहराच्या बाजूने आवाज उठवणे गरजेचे असून एमपीएससीने सुधारित जाहिरात काढून अर्ज भरण्यासाठी एक महिन्याचा अवधी द्यावा अशी देखील मागणी त्यांनी या प्रसिद्धीपत्रकाव्दारे केली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणात लक्ष घालून एमपीएससीच्या व्यवस्थापन समितीला ही जाहिरात पू्न्हा प्रसिद्दध करुन त्या पदाची पात्रतेचे निकष पूर्ण करणाऱ्या उच्चशिक्षित उमेदवाराला न्याय द्यावा अशी मागणी केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी