30 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
Homeएज्युकेशनमुंबई, पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदांसाठी निवड समिती जाहीर, मातब्बर तज्ज्ञांचा समावेश !

मुंबई, पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदांसाठी निवड समिती जाहीर, मातब्बर तज्ज्ञांचा समावेश !

मुंबई विद्यापीठाचे (Mumbai University) कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांचा कार्यकाळ गेल्यावर्षी 10 सप्टेंबर 2022 रोजी सपंल्याने विद्यापीठाचे कुलगुरुपद रिक्त झाले होते. त्यानंतर शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. दिंगबर शिर्के यांचेकडे सधया विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा (Vice-Chancellor) अतिरिक्त कार्यभार आहे. आज राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी मुंबई विद्यापीठ तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Pune University) नव्या कुलगुरुंच्या निवडीसाठी स्वतंत्र निवड समित्या गठीत केल्या आहेत. (Mumbai, Pune University posts of Vice-Chancellor Selection committee announced)

विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डी. पी. सिंह यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई विद्यापीठाची कुलगुरु निवड समिती गठीत करण्यात आली आहे, तर अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकरिता कुलगुरु निवड समिती जाहीर करण्यात आली आहे.
आयआयटी वाराणसीचे संचालक प्रा. प्रमोद कुमार जैन, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद लिमये तसेच हैद्राबाद येथील इंग्रजी व परकीय भाषा विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. सुरेश कुमार (युजीसी प्रतिनिधी) हे मुंबई विद्यापीठ कुलगुरु निवड समितीचे अन्य सदस्य असतील.

हे सुद्धा वाचा

मुंबईतील एलाईट महाविद्यालयाचा शेतकऱ्यांसाठी कौतुकास्पद उपक्रम, चंद्रकांत पाटलांनी केले कौतुक

मुंबई विद्यापीठाच्या 30 जानेवारीच्या परीक्षा पुढे ढकलल्या

मुंबई विद्यापीठाचा अजब कारभार, कायद्याच्या अभ्यासक्रमात बेकायदा उपद्व्याप !

तर, आयआयटी कानपुरचे संचालक डॉ. अभय करंदीकर, जलसंपदा विभागाचे अतिर‍िक्त मुख्य सचिव दिपक कपूर तसेच कर्नाटक राज्य महिला विद्यापीठाच्या माजी कुलगुरु डॉ. मीना चंदावरकर (युजीसी प्रतिनिधी) हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कुलगुरु निवड समितीचे अन्य सदस्य असतील.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी