28 C
Mumbai
Saturday, September 16, 2023
घरएज्युकेशनकष्टाचे फळ लगेच मिळत नाही, झोपडपट्टीत राहुन मोहम्मद हुसेनने क्रॅक केली यूपीएससी

कष्टाचे फळ लगेच मिळत नाही, झोपडपट्टीत राहुन मोहम्मद हुसेनने क्रॅक केली यूपीएससी

मुंबईतील वा़डी बंदर येथील झोपडपट्टीत राहणाऱ्या गोदी कामगाराच्या मुलाने देशातील अतिशय कठीन समजल्या जाणाऱ्या युपीएससी परीक्षेत उज्ज्वल यश मिळवले आहे. वडील गोदीत सुपरवायझर घरची परिस्थिती अत्यंत बेताची मात्र जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पाचव्या प्रयत्नात अवघ्या 27 व्या वर्षी मोहम्मद हुसेने युपीएससी परीक्षेत 570 वी रँक मिळवत यशाला गवसणी घातली आहे.

वाडीबंदर येथील सोलापूर स्ट्रीट परीसरातील झोपडपट्टीत अत्यंत छोट्याशा झोपड्यात मोहम्मदचे कुटुंब राहते. मोहम्मदच्या वडिलांना मुलांना शिकविण्याची मोठी जिद्द त्यामुळेच मोहम्महला त्यांनी नेहमी पाठबळ देत शिक्षण दिले. अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये देखील त्यांनी मोहम्मदच्या स्वप्नांना आकार दिला. मोहम्मदचे आजोबा सरकारी नोकरीत होते, मात्र शिक्षण नसल्यामुळे मोहम्मदच्या वडिलांना मात्र सरकारी नोकरी करता आली नाही, त्यांनी गोदी कामगार म्हणून कामाला सुरुवात केली, सध्या ते गोदीत सुपरवायझर म्हणून काम करत आहेत. अशा परिस्थितीत मोहम्मदला मात्र त्यांनी चांगले शिक्षण दिले.

मोहम्मदचे कुटुंब देखील मोठे घरी आई-वडील, त्याचे भाऊ वहिनी त्यांची मुले असा मोठा परिवार आहे, त्याचे मुळचे कुटुंब तेलंगानातील असून गेल्या तीन पिढ्या ते मुंबईत स्थाईक आहे. मोहम्मदचे वडील रमझान यांनी आपल्या मुलाला चांगले शिक्षण मिळावे म्हणून डोंगरीतील सेंट जोसेफ शाळेत घातले, तेथे मोहम्मदने शिक्षण घेतले. त्यानंतर पदवीचे शिक्षण एलफिन्सटन काँलेजमधून पूर्ण केले. पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर युपीएससीची तयारी सुरु केली. त्यानंतर हज हाऊस येथे युपीएससीसाठी चालवल्या जाणाऱ्या कोचिंगमध्ये त्याने युपीएससीचा अभ्यास केला. तसेच पुण्यातील युनिक अॅकेडमी, दिल्लीतील जामिया मिलीया इस्लामिया येथे देखील त्याने युपीएससीचा अभ्यास केला.

हे सुद्धा वाचा

UPSC परीक्षेत महाराष्ट्राचा डंका; 70 अधिक उमेदवारांनी पटकावले यश

पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीचे युपीएससी परीक्षेत यश; पोलीस आयुक्तांनी केला सत्कार

वडिलांची चहाची टपरी, आई विडीकामगार पोरानं पांग फेडलं; मंगेश खिलारीचे युपीएससी परीक्षेत उज्ज्वल यश

यश हे अगदी सहज मिळते असे नाही, त्यासाठी खुप कष्ट घ्यावे लागतात. कष्टाचे फळ देखील लगेचच मिळेल असे नाही. मोहम्मदने युपीएससीचे चार अटेम्प्ट दिले. मात्र चार वेळा त्याला अपयश आले. अशावेळी कुटुंबातील सदस्यांनी, मित्रांनी त्याला प्रोत्साहीत केले. अभ्यासासाठी त्याला आधार दिला. मोहम्मदने अत्यंत बिकट परिस्थितीत कधी झोपड्यात राहुन कधी गोदामात राहुन अभ्यास केला. आणि अखेर पाचव्यांदा मोहम्मदला युपीएससी परिक्षेत उज्ज्वल यश आले.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी