28 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeएज्युकेशनमुंबई विद्यापीठाच्या कालीना परिसरातील इमारतींबाबत धक्कादायक खुलासा

मुंबई विद्यापीठाच्या कालीना परिसरातील इमारतींबाबत धक्कादायक खुलासा

टीम लय भारी

मुंबई : सन 1975 पासून वर्ष 2017 दरम्यान मुंबई विद्यापीठाच्या कालीना परिसरात बांधण्यात आलेल्या 63 पैकी 38 इमारतीस ओसी नसल्याची धक्कादायक माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मुंबई महानगरपालिकेने दिली आहे(Mumbai University Kalina Shocking revelation about buildings). 

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई विद्यापीठाकडे मुंबई विद्यापीठाच्या कालीना परिसरातील इमारतीस दिलेल्या ओसीची माहिती मागितली होती. मुंबई विद्यापीठाच्या पायाभूत नियोजन,कार्यान्वयन आणि परिरक्षण खात्याने अनिल गलगली यांस कळविले की एकूण 63 इमारतीपैकी फक्त 25 इमारतींना ओसी मिळाली असून 38 इमारतींना ओसी अद्यापपर्यंत मिळाली नाही.

‘विद्यार्थ्यांचा गळा आवळणाऱ्या घोटाळ्याचे धागे-दोरे थेट मंत्रालयापर्यंत पोहचलेले आहेत’ आरोग्य विभागाच्या घोटाळ्यावरुन गोपीचंद पडळकर संतप्त

MHADA परीक्षा पेपरफुटी प्रकरणी सहा आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी

ओसी मिळालेली इमारती

1 रानडे भवन

2 टिळक भवन

3 वर्क शॉप

4 WRIC गेस्ट हाऊस

5 एसपी लेडीज हॉस्टेल

6 न्यू क्लास क्वार्ट्स

7 महात्मा फुले भवन

8 ज्ञानेश्वर भवन

9 यूरसिसन अभ्यास स्टाफ क्वार्ट्स

10 ए, बी, सी, डी, ई, एफ

11 सीडी देशमुख भवन

12 डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन

13 प्रेस गोडाऊन

14 अबुल कलाम बिल्डिंग

15 फिरोजशहा मेहता भवन

16 अण्णा भाऊ साठे भवन

17 पक्षी भवन, ग्लास भवन

18 कुलगुरु बंगला

हा तर शिक्षण व्यवस्था मोडित काढण्याचा ठाकरे सरकारचा डाव; भाजपचा हल्लाबोल

Internationalisation Of Indian Higher Education System Need Of The Hour, Multi-Pronged Approach Required For It: NITI Aayog CEO

ओसी नसलेली इमारती

1 ICSSR हॉस्टेल

2 रीडरर्स क्वार्ट्स 12 A, 12B, 12 C

3 विद्यार्थी कॅन्टीन

4 ओल्ड लेक्चर हॉल कॉम्प्लेक्स

5 जेएन लायब्ररी

6 जेपी नाईक भवन

7 WRIC प्रशासकीय इमारत

8 आरोग्य केंद्र

9 कर्मवीर भाऊराव पाटील बॉयज हॉस्टेल

10 एमडीके लेडीज हॉस्टेल

11 गरवारे इन्स्टिट्यूट ओल्ड

12 न्यू गरवारे इन्स्टिट्यूट

14 वर्क शॉप गरवारे

15 स्टाफ क्वार्ट्स G

16 पंडिता रमाबाई लेडीज हॉस्टेल

17 अलकेश दिनेश मोदी गॅलरी

18 मराठी भवन

19 आयडॉल इमारत

20 झंडू इन्स्टिट्यूट

21 अनेक्स बिल्डिंग

22 लाईफ सायन्स बिल्डिंग

23 एक्साम कॅन्टीन

24 शिक्षक भवन

25 पोस्ट ऑफिस

26 सर्व्हट क्वार्ट्स

27 न्यू लेक्चर कॉम्प्लेक्स

28 संस्कृत भवन

29 भाषा भवन

30 राजीव गांधी सेंटर

31 आयटी पार्क

32 शंकरराव चव्हाण टीचर्स टेर्निंग अकादमी

33  UMDAE हॉस्टेल

34 UMDAE फॉकलिटी बिल्डिंग

35 नॅनो सायन्स आणि नॅनो टेक्निकल

अनिल गलगली यांच्या मते कालीना परिसरातील ज्या इमारतीस ओसी नाही त्यात मुंबई विद्यापीठ आणि वास्तुविशारद यांची चूक असून या बाबीची चौकशी करत कारवाई करण्याची मागणी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिक्षण मंत्री उदय सामंत यांस पाठविलेल्या पत्रात केली आहे. ओसी नसलेल्या इमारतीत हजारों विद्यार्थी आणि विद्यापीठातील अधिकारी आणि कर्मचारी वृंद यांची ये-जा असून मंजूर आराखडा प्रमाणे काम झाले नसून एफएसआय उपलब्ध असल्यामुळे सुधारित आराखडा सादर करण्याची आवश्यकता आहे, असे मत अनिल गलगली यांनी व्यक्त केले आहे. ऑटोडीसीआर ऑनलाईन प्रणाली मार्फत आवश्यक कागदपत्रे सादर केल्यास ओसी मिळवली जाऊ शकते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी