31 C
Mumbai
Saturday, December 14, 2024
Homeएज्युकेशनमुंबई विद्यापीठाच्या अधिसभेवरील 10 नोंदणीकृत पदवीधरांच्या जागांकरिता ‘या’ दिवशी होणार  निवडणूक

मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेवरील 10 नोंदणीकृत पदवीधरांच्या जागांकरिता ‘या’ दिवशी होणार  निवडणूक

10 जागांवरील निवडणूकीसाठी एकूण 28 उमेदवार असून या निवडणूकीसाठी एकूण 19,406 मतदार आहेत. मुंबई विद्यापीठ परिक्षेत्रातील एकूण 38 मतदान केंद्रावर आणि 64 बुथवर ही निवडणूक पार पडणार आहे. (Mumbai University Senate Election)

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 मधील कलम  28(2)(न) नुसार अधिसभेवर 10 नोंदणीकृत पदवीधरांच्या जागांकरिता दिनांक 22 सप्टेंबर 2024 रोजी मतदान पार पडणार आहे. 10 जागांवरील निवडणूकीसाठी एकूण 28 उमेदवार असून या निवडणूकीसाठी एकूण 19,406 मतदार आहेत. मुंबई विद्यापीठ परिक्षेत्रातील एकूण 38 मतदान केंद्रावर आणि 64 बुथवर ही निवडणूक पार पडणार आहे. (Mumbai University Senate Election)

गरवारे व्यवसाय शिक्षण आणि विकास संस्थेत सुरु झाले सहा नवीन प्रमाणापत्र अभ्यासक्रम

विद्यापीठाच्या https://mu.eduapp.co.in या संकेतस्थळावर केंद्रनिहाय आणि बुथनिहाय मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली असून मतदार त्यांच्या नावाने आणि मोबाईल फोन क्रमांकाच्या आधारे त्यांचे मतदार यादीतील नाव, मतदान केंद्र आणि बुथ क्रमांक पाहू शकतील. (Mumbai University Senate Election)

मुंबई विद्यापीठाच्या गरवारे संस्थेत शिका रिस्क मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम सुरु

विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने या निवडणूकीसाठी आवश्यक ती सर्व तयारी करण्यात आली आहे. 38 केंद्र आणि 64 बुथसाठी आवश्यक कर्मचारी आणि निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. आज मतदार केंद्रासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण पार पडले असून पुढील प्रशिक्षण 19 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे. ही निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पडण्यासाठी सर्वच स्तरातून सहकार्य अपेक्षित असून 25 सप्टेंबर 2024 रोजी या निवडणूकीचा निकाल जाहीर केला जाणार असल्याचे कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रसाद कारंडे यांनी सांगितले. (Mumbai University Senate Election)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी