29 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeएज्युकेशनNIRF च्या रँकिंगमध्ये मद्रास आयआयटी सलग पाचव्या वर्षी अव्वलच

NIRF च्या रँकिंगमध्ये मद्रास आयआयटी सलग पाचव्या वर्षी अव्वलच

केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे आज 2023 साठी नॅशनल इंन्स्टिट्यूशन रँकिंग फ्रेमवर्क रॅंकिंग जाहीर झाले. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT), मद्रासने सलग पाचव्या वर्षी नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्क, 2023 मध्ये आपले स्थान कायम राखले आहे, तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बॅंगलोरला सर्वोत्कृष्ट विद्यापीठ म्हणून मानांकन देण्यात आले. आयआयटी दिल्लीला दुसरे स्थान मिळाले आहे. तर आयआयटी बॉम्बे देशातील सर्वोत्तम संस्थांच्या यादीत चौथ्या स्थानावर आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी आयआयटी बॉम्बेची एका अंकानी पिछाडी झाली आहे.

अभियांत्रिकी (इंजिनीअरींग) संस्थांमध्ये, IIT मद्रासने सलग आठव्या वर्षी अव्वल स्थान कायम राखले आहे. आयआयटी दिल्ली आणि आयआयटी बॉम्बे यांना दुसरे आणि तिसरे स्थान मिळाले आहे. NIRF रँकिंग मध्ये दिल्ली विद्यापीठाच्या मिरांडा हाऊस आणि हिंदू कॉलेजने महाविद्यालयांमध्ये प्रथम आणि द्वितीय क्रमांक पटकावला असून त्यानंतर चेन्नईच्या प्रेसिडेन्सी कॉलेजचा तिसरा क्रमांक लागतो.

व्यवस्थापन महाविद्यालयांमध्ये, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) अहमदाबादला सर्वोच्च स्थान देण्यात आले आहे, त्यानंतर IIM बेंगळुरू आणि IIM कोझिकोड यांचा क्रमांक लागतो. फार्मसीमध्ये, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च, हैदराबादला प्रथम क्रमांक मिळाला आहे. जामिया हमदर्द आणि बिरला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पिलानी दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.

हे सुद्धा वाचा 

प्रदूषणाचा मुकाबला करण्यात स्वतः चीच स्वतः शी निर्णायक भूमिका…

डॉ. तात्याराव लाहने, डॉ. रागिणी पारेख यांचा राजीनामा सरकारकडून तातडीने मंजूर

डॉ. तात्याराव लाहने, डॉ. रागिणी पारेख यांचा राजीनामा सरकारकडून तातडीने मंजूर

त्याचप्रमाणे कायद्यासाठी, नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी, बेंगळुरू त्यानंतर नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, दिल्ली आणि NALSAR युनिव्हर्सिटी ऑफ लॉ, हैदराबाद यांनी क्रमवारी यादीत स्थान मिळवले आहे. शिक्षण मंत्रालयाने जाहीर केलेल्या NIRF रँकिंगनुसार इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बेंगळुरू हे भारतातील सर्वोच्च विद्यापीठ आहे. तर जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी दिल्ली आणि जमिया मिलिया इस्लामिया दिल्ली ही विद्यापिठे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी