29 C
Mumbai
Friday, September 15, 2023
घरएज्युकेशनआईचं कलेक्टर होण्याच स्वप्न अधुरे राहिले: मुलाने युपीएससीत मिळवले दमदार यश

आईचं कलेक्टर होण्याच स्वप्न अधुरे राहिले: मुलाने युपीएससीत मिळवले दमदार यश

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सन 2022 सालच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी (दि.23) रोजी जाहीर झाला. या परीक्षेत सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील दहीवडीच्या ओंकार गुंडगे यांने उज्ज्वल यश मिळवले, देशपातळीवर त्याने 380 वी रॅँक मिळवले. माण तालुक्याने अनेक कार्यक्षम अधिकारी दिले, तीच परंपरा ओंकारने देखील जपली आहे. ओंकारच्या आई सुवर्णा यांचे कलेक्टर होण्याचे स्वप्न अधुरे राहिले होते. मात्र मुलाने ते स्वप्न पूर्ण केल्याचे त्या म्हणाल्या.

ओंकार गुंडगे याने पाचव्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास झाला. चार वेळा अपयश आल्यानंतर देखील त्याने जिद्दीने परीक्षा दिली आणि देशपातळीवर 380 वी रॅँक मिळविली. ओंकारचे प्राथमिक शिक्षण म्हसवड येथील मेरीमाता इंग्लिश स्कूल मीडियम म्हसवड येथे झाले. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी तो मुंबईत आला. त्याचे उच्च माध्यमिक शिक्षण रुईया कॉलेजमधून झाले. पुढे त्याने पुण्यातील आयएलएस लॉ कॉलेजातून २०१७ साली त्याने बीएसएलएलएलबी ही पदवी मिळवली. त्याच वेळी त्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्याची जिद्द बाळगत दिल्लीकडे कुच केले.

हे सुद्धा वाचा

UPSC परीक्षेत महाराष्ट्राचा डंका; 70 अधिक उमेदवारांनी पटकावले यश

कष्टाचे फळ लगेच मिळत नाही, झोपडपट्टीत राहुन मोहम्मद हुसेनने क्रॅक केली यूपीएससी

पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीचे युपीएससी परीक्षेत यश; पोलीस आयुक्तांनी केला सत्कार

युपीएससी परीक्षेसाठी दिल्लीत ओंकारने अभ्यासाची तयारी सुरु केली. मात्र चार वेळा मुख्य परीक्षेत त्याला यश आले नाही. त्यानंतर देखील त्याने अभ्यासातील सातत्य कायम ठेवत पाचव्यांदा यूपीएससी परीक्षेची तयारी सुरु केली. पाचव्या प्रयत्नात त्याला उत्तुंग यश मिळाले. ओकांर म्हणाला, सोशल मीडियापासून दूर राहत आठ ते दहा तास अभ्यास केला तर यश मिळवता येईल, मात्र अभ्यासासाठी व्यायाम देखील तेवढाच गरजेचा आहे, व्यायामामुळे उर्जा मिळते असे देखील ओंकारने माध्यमांशी बोलताना सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी