नुकताच बारावीचा निकाल लागला असून पालक आणि विद्यार्थी यांची कुठले क्षेत्र निवडायचे याविषयी फार धांदल उडालेली आहे(Opportunity to get modern education in media sector in University of Mumbai). काही क्षेत्रात आता प्रवेश प्रक्रियेला सुरूवात देखील झालेली आहे. यालाच महत्त्व देत लय भारीचे संपादक तुषार खरात यांनी पत्रकारिते विषयी त्या अभ्यासक्रमाविषयी माहीती देण्याच्या हेतूने मुंबई विद्यापीठाचे पत्रकारिता विभागाचे (विभागप्रमुख, पत्रकारिता व संज्ञापन विभाग, मुंबई विद्यापीठ) डॉ. सुंदर राजदीप यांची मुलाखत घेतली आहे. पत्रकारितेच्या अभ्यासक्रमाविषयी सांगताना पद्युत्तर पत्रकारितेचे मास्टर कोर्स मुंबई विद्यापीठात उपलब्ध असून आता प्रवेश प्रक्रियादेखील सुरू आहे असे डॉ. राजदीप यांनी सांगितले. अभ्यासक्रमाविषयी माहिती देत असताना तंत्रज्ञानात बदल झाला तसा अभ्यासक्रमातंही बदल केला गेला आहे असे डॉ. राजदीप यांनी सांगितले. शिवाय बदललेल्या अभ्यासक्रमाला लक्षात घेत शिकवण्याच्या पद्धती ही बदललेल्या आहेत. तंत्रज्ञानाचा वापर केला जातोय. आता डिजीटल फॉरमॅट मध्ये पत्रकारितेचे स्वरूप बदललेलं असून त्या अनुषंगाने अभ्यासक्रमात बदल केला गेला असल्याचं डॉ. सुंदर राजदीप यांनी लय भारीचे संपादक तुषार खरात यांच्याशी मुलाखतीत बोलताना सांगितले.
मुंबई विद्यापीठात माध्यम क्षेत्रातील आधुनिक शिक्षण घेण्याची संधी
लय भारीचे संपादक तुषार खरात यांनी पत्रकारिते विषयी त्या अभ्यासक्रमाविषयी माहीती देण्याच्या हेतूने मुंबई विद्यापीठाचे पत्रकारिता विभागाचे (विभागप्रमुख, पत्रकारिता व संज्ञापन विभाग, मुंबई विद्यापीठ) डॉ. सुंदर राजदीप यांची मुलाखत घेतली आहे.