मुंबई विद्यापीठाच्या गरवारे व्यवसाय शिक्षण आणि विकास संस्थेत पेंट तंत्रज्ञानातील संधी आणि आव्हानांवर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तज्ज्ञांनी आपले मत मांडले. यावेळी त्यांनी सांगितले की,पर्यावरणाच्या सुरक्षिततेची खात्री बाळगून वॉटर बेस्ड् आणि सॉल्वेंट बेस्ड् पेंट्सचे महत्व वाढत आहे. तसेच पेंट उद्योगातील गरजा आणि संधीचे क्षेत्र लक्षात घेता या उद्योगात कायम नाविन्यता आणि शाश्वतेवर अधिक भर द्यावा लागणार असल्याचे त्यांनी व्यक्त केले. (Organized National Symposium in Paint Technology at Mumbai University)
कातकरी समाजातील विद्यार्थिनीला बारावीच्या परिक्षेत उत्तुंग यश
या संस्थेच्या मार्फत प्रसिद्ध असा पेंट टेक्नोलॉजीचा अभ्यासक्रम राबविला गेला. या क्षेत्रातील नवीन आयामांवर प्रकाश टाकण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या पाच दिवसीय कार्यशाळेचे उद्धाटन सौरदिप केमिकल इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष डॉ. किशोर शहा, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा. शिवराम गर्जे आणि संस्थेचे संचालक प्रा. केयुरकुमार नायक यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.(Organized National Symposium in Paint Technology at Mumbai University)
दहावीच्या निकालात मुलींनी मारली बाजी
या पाच दिवशीय कार्यशाळेत तांत्रिक सत्र, प्रात्यक्षिके आणि संवादाच्या माध्यमातून विविध पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला. ज्यामध्ये पेंट फॉर्म्युलेशनमधील नवकल्पनामध्ये पर्यावरणास अनुकूल आणि टिकाऊ पेंट्स विकसित करण्यासाठी नवीन सामुग्री आणि पद्धतींचा शोध घेणे, पेंट मॅन्युफॅक्चरिंगमधील टिकाऊपणात पेंट उत्पादनाचा पर्यावरणीय प्रभाव कमी करण्यासाठी सर्वोत्तम पद्धती आणि उदयोन्मुख ट्रेंड, कोटिंग तंत्रज्ञानातील नाविन्यता, गुणवत्ता नियंत्रण आणि चाचणी आणि पेंट उद्योगातील बदलत्या बाजारातील गतिशीलता आणि ग्राहक प्राधान्ये समजून घेणे अशा विविध महत्वाच्या क्षेत्रांवर मान्यवरांनी प्रकाश टाकला. (Organized National Symposium in Paint Technology at Mumbai University)
पेंट टेक्नॉलॉजी विषयावरील राष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळेच्या माध्यमातून या क्षेत्रातील तज्ज्ञ, संशोधक आणि विद्यार्थी यांच्यात ज्ञानाची देवाणघेवाण, कौशल्य विकास आणि नेटवर्किंगसाठी एक मोठे व्यासपीठ उपलब्ध होण्यास हातभार लागणार असून, कार्यशाळेदरम्यान ज्या विविध पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला त्यामुळे भारतातील पेंट उद्योगाच्या वाढीसाठी आणि प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण योगदान लाभणार असल्याचा आशावाद मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी व्यक्त केला. (Organized National Symposium in Paint Technology at Mumbai University)
या पाच दिवशीय कार्यशाळेत पेंट उद्योगातील विविध तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. यामध्ये मुकुंद हुल्याळकर, दिलीप राघवन, शिवाजी दुर्गावळे, राजीव गोपलानी, हिरेन शहा, इशान रावेशिया, उमेश तावडे आणि संचालक नवोपक्रम आणि नवसंशोधन डॉ. सचिन लढ्ढा यांचा समावेश होता. या कार्यशाळेसाठी देशभरातील पेंट उद्योग क्षेत्रातील उत्पादक, पुरवठादार, सेवा प्रदाते, संशोधक आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती लाभली होती. (Organized National Symposium in Paint Technology at Mumbai University)
के.टेक प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक सुभाष श्रीवास्तव आणि अधिसभा सदस्य धनेश सांवत यांच्या हस्ते कार्यशाळेतील सहभागींना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. 5 ते 10 ऑगस्ट 2024 दरम्यान या कार्यशाळेचे यशस्वी आयोजन अभ्यासक्रम समन्वयक डॉ. अलीम अंसारी आणि त्यांच्या चमूने केले. (Organized National Symposium in Paint Technology at Mumbai University)