32 C
Mumbai
Thursday, April 18, 2024
Homeएज्युकेशनशिक्षण क्षेत्रातील नवीन प्रवाह, भाकर फाऊंडेशनचा मार्गदर्शन उपक्रम !

शिक्षण क्षेत्रातील नवीन प्रवाह, भाकर फाऊंडेशनचा मार्गदर्शन उपक्रम !

भाकर फाऊंडेशन (Bhakar Foundation) आयोजित विशेष अभिमुखता कार्यक्रमासाठी डाॅ. अंजली अंजली श्रीवास्तव, सुश्री संघमित्रा नवलगुंड आणि सुश्री वृंदा उदियावर या 3 प्राध्यापकांसह विभागप्रमुख डॉ. पार्तिमा गोयल आणि विद्यार्थी उपस्थित होते. शैक्षणिक अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून विद्यार्थ्यांनी उत्सफुर्त सहभाग यावेळी नोंदवला.

शैक्षणिक वर्षांत नवनवीन उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमधील कौशल्ये विकसित करण्याचा प्रत्येक महाविद्यालयाचा प्रयत्न असतो. नेमकं पण अचूक असे ज्ञान विद्यार्थ्यांना कोठून मिळेल यासाठी शिक्षकवर्गाकडून दरवेळी वेगवेगळे प्रयोग सुरू असतात. भाकर फाऊंडेशनकडून (Bhakar Foundation) सुद्धा अशाच एका अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी निर्मला निकेतन महाविद्यालयाच्या टेक्सटाईल आणि फॅशन टेक्नॉलॉजी विभागाच्या होम सायन्सचे तिसऱ्या वर्षातील विद्यार्थी सहभागी झाले होते. भाकर फाऊंडेशन आयोजित विशेष अभिमुखता कार्यक्रमासाठी डाॅ. अंजली अंजली श्रीवास्तव, सुश्री संघमित्रा नवलगुंड आणि सुश्री वृंदा उदियावर या 3 प्राध्यापकांसह विभागप्रमुख डॉ. पार्तिमा गोयल आणि विद्यार्थी उपस्थित होते. शैक्षणिक अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून विद्यार्थ्यांनी उत्सफुर्त सहभाग यावेळी नोंदवला.

हे सुद्धा वाचा

Kirit Somaiya : किरटी सोमय्यांची उद्धव ठाकरे यांच्यावर आगपाखड !

Ajit Pawar : अजित पवार म्हणाले, राज्यात दोनच ‘टिकोजीराव’, जाणून घ्या कुणाबद्दल…

Azadi ka Amrut Mahotsav : स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष विद्यार्थ्यांच्या, नागरिकांच्या ‘उपेक्षां’नी होणार साजरे

या कार्यकमाच्या माध्यमातून विद्यार्थी गटाने भाकर फाऊंडेशनसोबत वार्षिक समवर्ती फिल्डवर्क करण्याचे ठरवले आहे. महाविद्यालयाच्या शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या विषयांतर्गत शाश्वत समुदाय कार्य आणि शाश्वत सामाजिक उद्योजकता भाकर फाउंडेशनसोबत समुदाय विकास कार्यक्रमांमध्ये आमचा सहभाग असेल. यामध्ये जिथे महिला आणि तरुण मुलींच्या सामाजिक उद्योजकांचा विकास करण्याचे त्यांचे उद्दिष्ट असून भाकर फाऊंडेशनसोबत 36 विद्यार्थी दर आठवड्याला त्यांना नेमून दिलेले फील्डवर्क करणार असल्याचे चालक दीपक सोनवणे यांनी सांगितले आहे.

या कार्यक्रमाचे लाभार्थी एकल माता, घरकामगार, बेरोजगार महिला, गृहिणी, मुले आणि तरुण मुली असतील. त्यांच्या सहभागातून लक्ष्यित लाभार्थ्यांना सामाजिक उद्योजकता प्रशिक्षण, कौशल्ये आणि त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन प्रदान केले जाणार आहे. दरम्यान आजच्या अभिमुखता भेटीदरम्यान संस्थापक/संचालक दीपक सोनवणे आणि सुमित जगताप यांनी त्यांना फाउंडेशनच्या विविध प्रकल्प आणि कार्यक्रमांची माहिती दिली तसेच त्यांनी भाकर कम्युनिटी सेंटर्समध्ये फिरून विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना समाजाचा अनुभव दिला आणि महिला आणि मुलांच्या गटांशी त्यांची ओळख करून दिली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी