27 C
Mumbai
Saturday, March 18, 2023
घरएज्युकेशनरघुनाथ माशेलकर, प्रा. संजय धांडे, वसंत काळपांडे यांनी सांगितले अर्थसंकल्पातील फायदे-तोटे

रघुनाथ माशेलकर, प्रा. संजय धांडे, वसंत काळपांडे यांनी सांगितले अर्थसंकल्पातील फायदे-तोटे

आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. या अर्थसंकल्पात तरुणांच्या हातात बरेच काही आले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) यांनीही वैद्यकीय आणि कृषी क्षेत्रातील रोजगार आणि विकासावर भर दिला आहे. त्यामुळे देशभरातील तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. (Raghunath Mashelkar, Prof. Sanjay Dhande, Vasant Kalpande told the advantages and disadvantages of the budget)

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात तरुणांसाठी अनेक योजना जाहीर केल्या आहेत. केंद्रीय अर्थसंकल्प 2023 हा 7 भागांमध्ये विभागला गेला आहे – सर्वसमावेशक वाढ, शेवटच्या टप्प्यावर पोहोचणे, पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक, संभाव्य विकास आणि उपयोग, हरित वाढ, युवा शक्ती आणि वित्तीय क्षेत्र. अर्थसंकल्पात शिक्षण आणि रोजगार क्षेत्राला काय मिळाले. त्याअनुषंगाने राज्यातल्या काही मात्तबर व्यक्तींनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

महाराष्ट्र शासन पुणे जिल्ह्याचे सेवानिवृत्त शिक्षण संचालक आणि विशेष सल्लागार वसंत काळपांडे (Vasant kalpande) यांनी मांडलेल्या विचारांनुसार, शिक्षणात केंद्र सरकारचा वाटा बराच कमी असल्यामुळे त्याकडे मर्यादित दृष्टीनेच पाहायला हवे. शिक्षक प्रशिक्षण, डिजिटल ग्रंथालये आणि ग्रामीण भागातील ग्रंथालये यांवर दिलेला भर स्वागतार्ह वाटतो. पण केंद्र सरकारपुढील तरतुदींची अंबलबजावणी पार पाडणे ही पूर्णतः राज्याची जबाबदारी आहे. केंद्राच्या तरतुदीला आवश्यक असणाऱ्या आपल्या वाट्याची पुरेशी तरतूद करणे आणि या योजनांची कार्यक्षमतेने अंमलबजावणी करणे ही राज्य सरकारचीच जबाबदारी आहे.

त्याचप्रमाणे नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन आणि  ग्लोबल रिसर्च अलायन्स, इंडियन नॅशनल सायन्स अकादमीचे अध्यक्ष रघुनाथ माशेलकर (Raghunath Mashelkar) यांच्या मते, देशासाठी अर्थसंकल्पातील प्राधान्यक्रम अतिशय महत्त्वाचा आहे. एकंदरीत या सर्व समावेशक तरतुदी आहेत. ज्यामध्ये भविष्यातील ‘हरित वाढ’ला अधिक महत्त्व दिले आहे. तसेच युवा शक्ती हनुमान उडी कशी घेऊ शकते यावर भर देण्यात आला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात विज्ञान आणि तंत्रज्ञानाला १० टक्के वाढ देण्यात आली आहे. तर हे एकूणच हा डिजिटल बॅलन्स ग्रोथ बजेट आहे.

राज्याचे खास तंत्रज्ञ, IIT कानपूरचे माजी संचालक आणि शिक्षणतज्ज्ञ संजय धांडे (Sanjay Dhande) यांनी मांडलेल्या विचारांनुसार शिक्षणाच्या दृष्टीकोनातून हा चांगला अर्थसंकल्प आहे. वैद्यकीय शिक्षणावर भर देण्याची सरकारची इच्छा असल्याचे नर्सिंग कॉलेजांच्या घोषणेवरून दिसून येते. इतर अनेक तरतुदी आहेत ज्या सुद्धा विध्यार्थ्यांच्या हिताच्या आहेत.

हे सुद्धा वाचा : Budget 2023 : गुड न्यूज… देशात 740 एकलव्य शाळा अन् 38,800 शिक्षकांची भरती!

Budget 2023: अर्थमंत्र्यांच्या भाषणात असतील हे काही खास आर्थिक शब्द, त्यांचा अर्थ जाणून घ्या म्हणजे तुम्हालाही सहज समजेल अर्थसंकल्प

BUDGET 2023-24 : अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारात तेजी, ७ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर नाही; जाणून घ्या अजून काय आहे बजेटमध्ये

भारतात कृषी क्षेत्रातील स्टार्टअपला प्रोत्साहन दिले जाईल. देशातील सर्वोच्च शैक्षणिक संस्थांमध्ये उत्कृष्टतेसाठी केंद्रे स्थापन केली जातील. यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) वर लक्ष केंद्रित केले जाईल. उद्योग भागीदारीमुळे पुढील 3 वर्षांत लाखो तरुणांना कौशल्य प्रशिक्षण आणि नोकरीचे प्रशिक्षण दिले जाईल. तरुणांना आंतरराष्ट्रीय संधींसाठी तयार करण्यासाठी वेगवेगळ्या राज्यांमध्ये 30 स्किल इंडिया इंटरनॅशनल सेंटर्सची स्थापना केली जाईल. संशोधनातील गुंतवणूक वाढेल. शिक्षकांना प्रशिक्षण देण्याची पद्धत बदलेल, अशा बऱ्याच विषयांवर अर्थसंकल्पात तरतुदी मांडल्या आहेत.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी