28.9 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeएज्युकेशनकर्मवीर भाऊराव पाटलांच्या धोरणाला रयत शिक्षण संस्थेने फासला हरताळ; विद्यार्थी वाऱ्यावर

कर्मवीर भाऊराव पाटलांच्या धोरणाला रयत शिक्षण संस्थेने फासला हरताळ; विद्यार्थी वाऱ्यावर

कर्मवीर भाऊराव पाटील यांनी चांद्यापासून बांद्यापर्यंत पायपीट करुन मोठ्या कष्टाने गोरगरीब, बहूजन मुलांसाठी शिक्षणाची कवाडे खुली केली. मात्र कर्मवीरांच्या या धोरणालाच रयत शिक्षण संस्थेने (Rayat Shikshan Sanstha) हरताळ फासला असून अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कायम दुष्काळी असलेल्या माण तालुक्यातील महिमानगड (Mahimangad) येथील न्यू इंग्लिश स्कुल अॅन्ड ज्युनियर कॉलेज अत्यंत वाईट अवस्थेत आहे. या शिक्षण संस्थेच्या कॉलेजला इमारत नाही, शाळेला पुरेसे शिक्षक  (insufficient teachers) नाहीत त्यामुळे शिक्षण संस्थेने विद्यार्थी वाऱ्यावर सोडल्याची संतप्त भावना पालकवर्ग, ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. (Rayat Shikshan Sanstha’s School Of Mahimangad insufficient teachers, the building work has also stopped)

कर्मवीर अण्णांनी शिक्षणकार्य हाती घेतल्यानंतर दुष्काळी अशा माण तालुक्यात देखील शाळा उभ्या राहू लागल्या. महिमानगड येथील ग्रामस्थांनी एकत्र येत श्रमदानातून येथे शाळेची इमारत उभी केली शाळा सुरु केली. मात्र सध्या शाळेला आणि कॉलेजला पुरेसे शिक्षक नाहीत. कॉलेजला इमारत नाही.

महिमानगडचे ग्रामस्थ आणि शाळेचे माजी विद्यार्थी वीरकुमार गांधी यांनी सांगितले की, येथील कॉलेजला केवळ दोनच पर्मनंट शिक्षक आहेत, तर काही शिक्षक तासिका तत्वावर काही शिक्षक आहेत. माध्यमिक विद्यालयासाठी गणित आणि इंग्रजी विषयाला देखील शिक्षक नाहीत. सध्या माध्यमिक विद्यालयात १६४ विद्यार्थी शिकत आहेत. या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी पुरेसे शिक्षकच उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य अंध:कारमय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हे सुद्धा वाचा

‘कृषि’तुल्य शरद पवार! (निवृत्त IAS अधिकारी प्रभाकर देशमुख यांचा विशेष लेख)

आमदार जयकुमार गोरे यांचे नाव ऐकताच अजित पवारांची सटकली

Udyanraje Bhosale: रयत शिक्षण संस्थेचे नामांतर पवार शिक्षण संस्था करा; खासदार उदयनराजेंची जळजळीत टीका

या कॉलेजमध्ये सायन्स, हॉर्टिकल्चर आणि इलेक्ट्रॉनिक विभाग आहेत. कॉलेजच्या ११ वी आणि १२ वी सायन्समध्ये १६४ विद्यार्थी शिकत आहेत. तर हार्टिकल्चर व इलेक्ट्रॉनिक्स 64 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाखांमधील प्रमुख विषयासंदर्भात शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची भीती देखील गांधी यांनी व्यक्त केली. गेल्या अनेक महिन्यांपासून येथे पर्मनंट शिक्षक उपलब्ध करुन देण्याची मागणी केली जात आहे. मात्र आता परीक्षा जवळ आली तरी शिक्षक उपलब्ध करुन दिलेले नाहीत. काही दिवसांपूर्वी येथे तासिका तत्त्वावर एक शिक्षक नियुक्त केला आहे, मात्र पुरेसा शिक्षकवर्ग अद्याप देखील उपलब्ध केलेला नाही त्यामुळे विद्यार्थी नापास झाल्यास त्याला जबाबदार कोण असा सवाल देखील गांधी यांनी केला आहे.

Ryat Shikshan Sanstha's School Of Mahimangad insufficient teachers, the building work has also stoppedRyat Shikshan Sanstha's School Of Mahimangad insufficient teachers, the building work has also stopped

शरद पवारांनी तीन वर्षांपूर्वी इमारतीचे उद्घाटन करुन देखील अद्याप मुहुर्त नाही

कॉलेजच्या इमारतीच्या सहा खोल्या पाडून चार वर्षे उलटून गेली आहेत. तेथे नव्या वर्गखोल्या बांधण्यात येणार होत्या. रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते साधारण तीन वर्षांपूर्वी या वर्गखोल्यांचे भूमीपूजन केले होते. मात्र तीन वर्षांपासून तेथे दगड देखील हलला नसल्याचे वीरकुमार गांधी यांनी ‘लयभारी’शी बोलताना सांगितले. कॉलेजच्या इमारतीच्या वर्गखोल्या पाडल्यामुळे काही वर्षांपासून विद्यार्थी शाळेच्या इमारतीत बसत आहेत. या इमारतीच्या बांधकामाचे काम देखील मागे पडल्याने आता ग्रामस्थ नाराजी व्यक्त करत आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी