32 C
Mumbai
Thursday, April 18, 2024
Homeएज्युकेशनSSC & HSC Exam Updates : विद्यार्थ्यांना दिलासा! दहावी, बारावी बोर्ड परीक्षेसाठी...

SSC & HSC Exam Updates : विद्यार्थ्यांना दिलासा! दहावी, बारावी बोर्ड परीक्षेसाठी मिळाली मुदतवाढ

या नव्या निर्णयानुसार बारावी बोर्डासाठी अर्ज दाखल करण्याची तारीख 30 नोव्हेंबर आहे, तर दहावी बोर्ड परीक्षेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर देण्यात आली आहे.

यंदाच्या वर्षी दहावी, बारावी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. या बोर्ड परीक्षांसाठी सध्या अर्ज दाखल करण्यात येत आहेत. सदर अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बोर्डाकडून घेण्यात आला आहे. या नव्या निर्णयानुसार बारावी बोर्डासाठी अर्ज दाखल करण्याची तारीख 30 नोव्हेंबर आहे, तर दहावी बोर्ड परीक्षेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर देण्यात आली आहे. दहावी, बारावी बोर्ड परीक्षेचे आवेदन पत्र सादर करण्यासाठी सदर मुदतवाढ देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बोर्डाकडून दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेसाठी अर्ज भरण्याची तारीख आणखी पुढे वाढवलीआहे. दहावी बोर्ड परीक्षेचा अर्ज भरण्याची आधीची मुदत 10 नोव्हेंबर पर्यंत देण्यात आली होती परंतु आता 25 नोव्हेंबर पर्यंत मुदवाढ देण्यात आली आहे तर बारावी परीक्षेची तारीख 04 नोव्हेंबर आधी देण्यात आली होती परंतु ती सुद्धा आता वाढवण्यात आली आहे. 30 नोव्हेंबर पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत.

हे सुद्धा वाचा…

Sambhaji Bhide : संभाजी भिडे यांना ‘टीकली’वरील वक्यव्य भोवणार? राज्य महिला आयोगाने बजावली नोटीस!

Pune News : गजा मारणे टोळीला मोठा धक्का; फरार आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

Mumbai News : मुंबई पुन्हा हाय अलर्टवर; हाजी अली दर्ग्यावर दहशतवादी हल्ला करण्याचा कट

दरम्यान, बोर्डाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने सदर अर्ज विद्यार्थ्यांना भरावे लागणार आहे. दहावी, बारावी बोर्ड परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक महाराष्ट्र राज्य मंडळाकडून जारी करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार बारावी बोर्डाची परीक्षा 21 फेब्रुवारी 2023 ते 20 मार्च 2023 दरम्यान होणार असून दहावी बोर्डाची परीक्षा 2 मार्च 2023 ते 25 मार्च 2023 या दरम्यान होणार आहे. संभाव्य वेळापत्रकाबाबत बोर्डाकडून लवकरच निश्चिती करण्यात येणार असून याबाबतचे फायनल वेळापत्रक जारी करण्यात येणार आहे.

दहावी बोर्डाचे संभाव्य वेळापत्रक

  • 2 मार्च – प्रथम भाषा ( मराठी, हिंदी उर्दू ,गुजराती व इतर प्रथम भाषा)
  • 3 मार्च – द्वितीय वा तृतीय भाषा
  • 6 मार्च – इंग्रजी
  • 9 मार्च – हिंदी ( द्वितीय किंवा तृतीय भाषा)
  • 11 मार्च – संस्कृत, उर्दू ,गुजराती पाली ( द्वितीय किंवा तृतीय भाषा)
  • 13 मार्च – गणित भाग – 1
  • 15 मार्च – गणित भाग 2
  • 17 मार्च – विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1
  • 20 मार्च – विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2
  • 23 मार्च – सामाजिक शास्त्र पेपर 1
  • 25 मार्च – सामाजिक शास्त्र पेपर 2

बारावी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक

  • 21 फेब्रुवारी  – इंग्रजी
  • 22 फेब्रुवारी  – हिंदी
  • 23 फेब्रुवारी – मराठी, गुजराती, बंगाली, तेलगू ,पंजाबी ,तामिळ
  • 24 फेब्रुवारी – संस्कृत
  • 27 फेब्रुवारी  – फिजिक्स
  • 1 मार्च – केमिस्ट्री
  • 3 मार्च – मॅथेमॅटिक्स अॅन्ड स्टॅटिस्टिक्स
  • 7 मार्च – बायोलॉजी
  • 9 मार्च – जियोलॉजी
  • 25 फेब्रुवारी-  ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अॅन्ड मॅनेजमेंट
  • 28 फेब्रुवारी – सेक्रेटरीयल प्रॅक्टिस
  • 1 मार्च – राज्यशास्त्र
  • 13मार्च – ऑफिस मॅनेजमेंट पेपर 1
  • 15 मार्च – ऑफिस मॅनेजमेंट पेपर 2
  • 9 मार्च – अर्थशास्त्र
  • 10 मार्च – बुक किपिंग अँड अकाउंटन्सी
  • 13 मार्च – बँकिंग पेपर – 1
  • 15 मार्च – बँकिंग पेपर – 2
  • 16 मार्च – भूगोल
  • 17 मार्च – इतिहास
  • 20 मार्च – समाजशास्त्र

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी